शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
3
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
4
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
5
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
6
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
7
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
8
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
9
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
10
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
11
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
12
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
13
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
14
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
15
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
16
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
17
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
18
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
19
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
20
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
Daily Top 2Weekly Top 5

कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 20:03 IST

देशाचे विद्यमान सरन्यायाधीश (CJI) बीआर गवई यांचा कार्यकाळ २३ नोव्हेंबर रोजी संपत आहे...

नवी दिल्ली: देशाचे विद्यमान सरन्यायाधीश (CJI) बीआर गवई यांचा कार्यकाळ २३ नोव्हेंबर रोजी संपत आहे. यामुळे पुढील सरन्यायाधीश निवडण्याची प्रक्रिया केंद्र सरकारने सुरू केली आहे. सहसा, सर्वोच्च न्यायालय अथवा उच्च न्यायालयांतील सर्वात वरिष्ठ न्यायाधीशांना हे महत्त्वाचे पद मिळते आणि विद्यमान सरन्यायाधीश त्यांच्या उत्तराधिकाऱ्याच्या नावाची शिफारस करतात. यानुसार, सीजेआय बीआर गवई यांनी आपल्यानंतरचे सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांचे नाव पुढील सरन्यायाधीश म्हणून घोषित केले आहे.

सीजेआय गवई सोमवारी (२७ ऑक्टोबर) केंद्र सरकारकडे न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नावाची औपचारिक शिफारस करणार आहेत. ते सध्या भूतान दौऱ्यावर आहेत. 'टाइम्स ऑफ इंडिया'सोबत बोलताना ते म्हणाले, "केंद्र सरकारकडून आपल्या कार्यालयाला पुढील सरन्यायाधीशांसाठी शिफारस मागवणारा संदेश मिळाला आहे. मी रविवार सायंकाळी दिल्लीला पोहोचेल आणि सोमवारी न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नावाची शिफारस करेन."

न्यायमूर्ती सूर्यकांत सध्या सीजेआय गवई यांच्यानंतर सर्वोच्च न्यायालयात सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश आहेत. हरियाणातील हिसार येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील शिक्षक होते आणि त्यांचे संपूर्ण बालपण संयुक्त कुटुंबात गेले. त्यांनी गावातील सरकारी शाळांमध्येच मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

१९८४ मध्ये महर्षी दयानंद विद्यापीठातून कायद्याची पदवी घेण्यापूर्वी त्यांनी १९८१ मध्ये हिसारमधून पदवी पूर्ण केली. न्यायाधीश म्हणून पदोन्नती होण्यापूर्वी सूर्यकांत यांनी वरिष्ठ वकील म्हणून आणि हरियाणाचे महाधिवक्ता म्हणूनही काम केले आहे. ते हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशही राहिले आहेत. न्यायमूर्ती सूर्यकांत २४ नोव्हेंबर २०२५ रोजी देशाचे पुढील सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील. 

English
हिंदी सारांश
Web Title : Justice Suryakant Likely Next Chief Justice of India: CJI Gavai

Web Summary : CJI BR Gavai to recommend Justice Suryakant as the next Chief Justice of India. Gavai's term ends November 23rd. Justice Suryakant, currently the senior-most judge, will likely be sworn in November 24, 2025, after Gavai formally recommends him to the central government.
टॅग्स :CJI BR GavaiCJI भूषण रामकृष्ण गवईSupreme Courtसर्वोच्च न्यायालयGovernmentसरकार