शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

CBI चे नवे प्रमुख कोण होणार?; राकेश अस्थाना, वाय.सी. मोदी, सुबोध कुमार जायस्वाल शर्यतीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 06:58 IST

राकेश अस्थाना हे गुजरातच्या १९८४ च्या आयपीएस  तुकडीचे, तर वाय.सी. मोदी हे आसाम-मेघालयच्या १९८४ च्या आयपीएस तुकडीचे अधिकारी आहेत.

हरीश गुप्ता नवी दिल्ली :   सीबीआयच्या नवीन प्रमुखांची निवड करण्यासाठी  २४ मे रोजी  पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरन्यायाधीश एन.व्ही. रमण आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांच्या उच्चाधिकारी समितीची बैठक होणार आहे. या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. राकेश अस्थाना (महासंचालक, सीमा सुरक्षा दल आणि अमलीपदार्थ नियंत्रण विभाग) आणि डॉ. वाय.सी. मोदी (महासंचालक, राष्ट्रीय तपास संस्था-एनआयए) या पदाच्या शर्यतीत असून, या पदासाठी उच्चाधिकार समितीकडे १०९ आयपीएस अधिकाऱ्यांची यादी तयार करून त्यांच्या संचिका  पाठविण्यात आल्या आहेत.

राकेश अस्थाना हे गुजरातच्या १९८४ च्या आयपीएस  तुकडीचे, तर वाय.सी. मोदी हे आसाम-मेघालयच्या १९८४ च्या आयपीएस तुकडीचे अधिकारी आहेत.  सर्वोच्च न्यायालयाने  २००२ च्या गुजरात दंगलीच्या चौकशीसाठी नियुक्त केलेल्या विशेष चौकशी पथकात वाय.सी. मोदी यांचा समावेश होता. २०१५ ते १७ दरम्यान वाय.सी. मोदी हे सीबीआयचे अतिरिक्त संचालक होते. २०१७ मध्ये ते एनआयचे महासंचालक झाले. हे दोन्ही अधिकारी एक-दोन महिन्यांत निवृत्त होणार आहेत. २०१९ मध्ये आलोक वर्मा आणि राकेश अस्थाना यांच्यातील संघर्षामुळे सीबीआय अभूतपूर्व वादात सापडली होती.

चर्चेत कोण?महाराष्ट्राचे माजी पोलीसप्रमुख आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे महासंचालक सुबोध कुमार जायस्वाल, भारत-तिबेट सीमा पोलीसदलाचे प्रमुख  एस.एस. देस्वाल,  उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक एच.सी. अवस्थी, केरळचे पोलीस महासंचालक लोकनाथ बेहरा आणि गुजरातच्या भ्रष्टाचारविरोधी विभागाने (एसीबी) प्रमुख केशव कुमार यांचाही यादीत समावेश आहे. केशव कुमार हे पूर्वी सीबीआयमध्ये होते.

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभाग