शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
3
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
4
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
5
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
6
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
7
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
8
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
9
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
10
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
11
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
12
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
13
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
14
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
15
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

कोण होणार भूपेंद्र पटेल सरकारमध्ये मंत्री? कोणाला आला शपथविधीसाठी कॉल? पाहा लिस्ट...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 11:11 AM

Bhupendra Patel Cabinet : गुजरातमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी आज होणार आहे, याआधीच आमदारांना फोन कॉल सुरू झाले आहेत.

अहमदाबाद : पुढील वर्षी गुजरातमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पार्टीने (भाजप) आपले संपूर्ण सरकार बदलले आहे. विजय रुपाणी यांना हटवल्यानंतर भूपेंद्र पटेल यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले आणि आता संपूर्ण मंत्रिमंडळात बदल करण्याची तयारी आहे. त्यामुळे भूपेंद्र पटेल सरकारच्या नव्या मंत्र्यांचा शपथविधी राजधानी गांधीनगरमध्ये दुपारी दीड वाजता होणार आहे. 

गुजरातमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी आज होणार आहे, याआधीच आमदारांना फोन कॉल सुरू झाले आहेत. ज्या आमदारांकडे फोन पोहोचत आहेत, ते मंत्री होण्याचे प्रबळ दावेदार आहेत. आतापर्यंत कोणापर्यंत फोन पोहोचला आहे आणि कोण मंत्री बनू शकतात? ते पाहूया...

1. मोरबीचे आमदार बृजेश मेरजा 2. राजकोट पूर्वचे आमदार अरविंद रयानी 3. लिमडीचे आमदार किरीट सिंह राणा 4. गणदेवीचे आमदार नरेश पटेल 5. सुरत माजुराचे आमदार हर्ष सांघवी 6. विसनगरचे आमदार ऋषिकेश पटेल 7. ओलपाडचे आमदार मुकेश पटेल 8. बडोदा शहराचे आमदार मनीषा वाकील

दरम्यान, गुजरातमध्ये भूपेंद्र पटेल सरकारच्या नव्या मंत्र्यांच्या शपथविधीपूर्वी मानापमान नाट्य रंगले. नाराज आमदार माजी मुख्यमंत्री रुपानी यांच्या निवासस्थानी पोहोचले. काल दिवसभराच्या या घटनाक्रमानंतर अखेर गुरुवारी नव्या मंत्र्यांनी शपथ घेण्याचे निश्चित करण्यात आले.

मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची चर्चा होती. यावरुन मतभेद झाले. भूपेंद्र पटेल हे बहुतांश मंत्र्यांमध्ये बदल करु इच्छित होते. २१ ते २२ मंत्र्यांना बुधवारी शपथ देण्यात येणार होती. मात्र, हा कार्यक्रम टाळण्यात आला. आता नव्या मंत्र्यांचा शपथविधी आता राजधानी गांधीनगरमध्ये दुपारी दीड वाजता होणार आहे. 

टॅग्स :Bhupendra Patelभूपेंद्र पटेलGujaratगुजरात