शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांसोबत असलेला तो तरुण संघाचा स्वयंसेवक नव्हताच, तर... जाणून घ्या व्हायरल सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 18:08 IST

विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवकांचाही समावेश होता, असा दावा एका व्हायरल फोटोच्या माध्यमातून करण्यात येत आहे...

नवी दिल्ली - नागिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांना पोलिसांनी केलेल्या मारहाणीचे प्रकरण सध्या तापले आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवकांचाही समावेश होता, असा दावा एका व्हायरल फोटोच्या माध्यमातून करण्यात येत होता. मात्र दिल्ली पोलिसांनी या फोटोबाबत खुलासा केला आहे. साध्या वेशामध्ये हेल्मेट आणि जॅकेट परिधान केलेला तो तरुण संघाचा स्वयंसेवक नव्हे तर दिल्ली पोलीस दलातील एएटीएसचा कॉन्स्टेबल असल्याचे दिल्ली पोलिसांनी स्पष्टीकरण दिले आहे. जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर जाळपोळ आणि हिंसाचाराचे प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी विद्यापीठाच्या आवारात घुसून विद्यार्थ्यांवर लाठीमार केला होता. दरम्यान, विद्यार्थ्यांसोबत पोलिसांच्या वेशात एबीव्हीपीचे कार्यकर्तेही घुसल्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले होते. त्यातच पोलिसांमध्ये साध्या वेशात असलेला एक तरुण हा एबीव्हीपीचा कार्यकर्ता भारत शर्मा असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे हा हिंसाचार कुणी भडकवला याचीही चर्चा सुरू झाली होती. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही एक फोटो शेअर केला होता. देशातील तरुणाई रस्त्यावर उतरली असून संपूर्ण देशात जयभीमची घोषणाबाजी होत आहे. पण, सर्वसामान्य नागरिकांवर हल्ला करण्याचे काम भाजपाकडून होत आहे. रस्त्यावर उतरलेल्या तरुणाईला केवळ लोकशाहीला वाचवायची आहे, त्यासाठीच ते रस्त्यावर उतरले आहेत. देशातील विद्यार्थी एकत्र आले आहेत, त्याचीच भिती भाजपाला वाटत आहे. पण, विद्यार्थ्यांचे आंदोलन जेव्हा एकत्र येते, तेव्हा सत्तातर होते, असे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले होते. आव्हाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला होता.मात्र दिल्ली पोलिसांनी सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा दावा फेटाळून लावला आहे. हा तरुण एबीव्हीपी आणि संघाचा कार्यकर्ता नव्हे तर दिल्ली पोलिसांच्या अँटी ऑटो थिप स्कॉडचा (AATS) कॉन्स्टेबल असल्याचे स्पष्टीकरण एका वरिष्ठ अधिकाऱ्याने  दिले आहे. तसेच छायाचित्रात दिसलेल्या पोलिसाचा आणि भारत शर्मा नावाचा काही संबंध नसल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.  दिल्ली पोलिसांकडून आलेल्या स्पष्टीकरणानंतर सोशल मीडियावरून संबंधित छायाचित्रे हटवण्यास सुरुवात झाली आहे.  दरम्यान, नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ परिसरात उसळलेल्या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी दहा जणांना अटक केली आहे. विशेष म्हणजे, अटक केलेल्या व्यक्तींमध्ये एकही विद्यार्थी नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. तसेच, अटक केलेल्या 10 लोकांपैकी 3 जण गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. 

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकNew Delhiनवी दिल्लीStudentविद्यार्थीPoliceपोलिसViral Photosव्हायरल फोटोज्