शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

तीन मुलांच्या आईवर कुणी कशाला बलात्कार करेल?; भाजपा आमदाराचे अजब तर्कट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2018 10:35 IST

मी मानशास्त्रीयदृष्ट्या बोलत आहे. कोणीही तीन मुलांच्या आईवर बलात्कार करणार नाही.

लखनऊ: उन्नावमधील सामूहिक बलात्कार प्रकरणावरून सध्या योगी सरकारला प्रचंड टीकेला सामोरे जावे लागत आहे. बैरिया येथील भाजपा आमदार सुरेंद्र सिंग यांच्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे या टीकेचा ओघ वाढण्याची शक्यता आहे. सुरेंद्र सिंह यांनी आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर यांचे समर्थन करताना 'कोणीही तीन मुलांच्या आईवर कशाला बलात्कार करेल', असे चीड आणणारे विधान केले आहे. मी मानशास्त्रीयदृष्ट्या बोलत आहे. कोणीही तीन मुलांच्या आईवर बलात्कार करणार नाही. हे शक्यच नाही. त्यामुळे हा सगळा प्रकार सेनगर यांच्याविरुद्ध रचलेले षडयंत्र आहे. पीडितेच्या वडिलांना कोणीतरी मारहाण केली असेल, पण मी बलात्काराचा आरोप निराधार मानतो, असे सुरेंद्र सिंह यांचे म्हणणे आहे.दरम्यान, या प्रकरणी गुरूवारी सकाळी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ते बुधवारी रात्री एसएसपींच्या निवासस्थानावरून आत्मसमर्पण न करताच माघारी परतले होते. या सामूहिक बलात्कार प्रकरणात कुलदीप सिंह सेनगर यांच्याविरोधात भादंवि कलम 363, 366, 376 आणि 506 तसेच पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता सेनगर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.  उन्नाव येथील युवतीवर झालेला बलात्कार आणि तिच्या वडिलांचा पोलीस कोठडीत झालेल्या मृत्यूप्रकरणी आरोप झालेले भाजपा आमदार कुलदीप सिंह सेंगर बुधवारी रात्री आत्मसमर्पण करणास असल्याचे वृत्त आले होते. मात्र प्रत्यक्षात ते आत्मसमर्पण न करताच ते एसएसपींच्या निवासस्थानातून माघारी परतले. मात्र एसएसपी हे उपस्थित नसल्याने आपण माघारी जात असल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. 

टॅग्स :Unnao rape caseउन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणBJPभाजपाRapeबलात्कार