शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

गरीब शेतकऱ्याचा मुलगा, बँक अधिकारी, पत्रकार ते राज्यसभेचे उपाध्यक्ष... कोण आहेत हरिवंश?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 13:24 IST

नवनियुक्त राज्यसभा उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांचा गरीब शेतकऱ्याचा मुलगा, बँक अधिकारी, पत्रकार ते राज्यसभा उपसभापती पदापर्यंतचा प्रवास हा अनेक चढउतारांनी भरलेला आणि अनेकांना प्रेरणा देणार आहे.

नवी दिल्ली - राज्यसभा उपसभापतीपदासाठी आज झालेल्या निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार हरिवंश यांनी बाजी मारली. संयुक्त जनता दल पक्षाचे नेते असलेले हरिवंश नारायण सिंह यांचा गरीब शेतकऱ्याचा मुलगा, बँक अधिकारी, पत्रकार ते राज्यसभा उपसभापती पदापर्यंतचा प्रवास हा अनेक चढउतारांनी भरलेला आणि अनेकांना प्रेरणा देणार आहे.   हरिवंश नारायण सिंह यांचा जन्म एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात झाला होता. हरिवंश नारायण सिंह हे लोकनायक जयप्रकाश नारायण यांचे गाव असलेल्या सिताब दियारा गावातील रहिवासी आहेत. हरिवंश यांच्या लहानपणी त्यांच्या कुटुंबाने आपली शेती गंगा नदीच्या प्रवाहामुळे गमावली होती.  जिद्दीने शिक्षण पूर्ण करून अर्थशास्त्र विषय घेऊन पदव्युत्तर पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी एक हिंदी वृत्तपत्र धर्मयुगमधून पत्रकारितेस सुरुवात केली. त्यानंतर बँक ऑफ इंडियामध्ये सरकारी अधिकारी म्हणून काही काळ काम करून ते पुन्हा एकदा पत्रकारितेत आले. 1989 मध्ये त्यांनी रांची येथून प्रकाशित होणाऱ्या दैनिक प्रभात खबर वृत्तपत्रात नोकरी सुरू केली. पुढे ते या वृत्तपत्राचे संपादक देखील झाले. 2014 साली जेडीयूकडून राज्यसभा सदस्य म्हणून नियुक्त झाल्यानंतर त्यांनी संपादकपदाचा राजीनामा दिला.  राज्यसभा सदस्य बनण्यापूर्वी हरिवंश यांनी माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचे राजकीय सल्लागार म्हणून काम पाहिले होते. चंद्रशेखर यांचे सल्लागार म्हणून काम पाहण्यासाठी त्यांनी प्रभात खबर या वृत्तपत्रातील आपल्या नोकरीचा राजीनामा दिला होता. मात्र चंद्रशेखर यांचे सरकार पडल्यानंतर ते पुन्हा एकदा याच वृत्तपत्रात रुजू झाले होते.  साधेपणाने जीवन व्यतित करणारे हरिवंश हे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचेन निकटवर्तीय मानले जातात. मात्र त्यांनी आपले संबंध कधीही सार्वजनिक होऊ दिले नाहीत. नितीश कुमार यांची राज्यात चांगली प्रतिमा निर्माण करण्यामध्ये हरिवंश यांचा हात असल्याचे म्हटले जाते. हरिवंश यांच्या राज्यसभा उपसभापतीपदी झालेल्या नियुक्तीमुळे भाजपा आणि जेडीयूमधील संबंध अधिक दृढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हरिवंश यांनी खासदार म्हणून नियुक्ती झाल्यानंतर पंतप्रधान आदर्श ग्राम योजनेसाठी बिहारमधील रोहतास जिल्ह्यातील बहुआरा गाव दत्तक घेतले होते. तसेच त्यांच्या खासदार निधीमधील मोठी रक्कम बिहारमधील आर्यभट्ट ज्ञान विश्वविद्यालयाती संशोधनावर खर्च होतो.  

टॅग्स :Harivansh Narayan Singhहरिवंश नारायण सिंहRajya Sabhaराज्यसभाBJPभाजपा