शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

२०२४ मध्ये पंतप्रधानपदासाठी मोदींविरोधातील चेहरा कोण? विरोधी पक्ष आखताहेत अशी रणनीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2023 22:49 IST

2024 Lok Sabha Election: २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष आपली रणनीती आखत आहेत. भाजपा आणि मित्रपक्षांकडून सत्तेत कायम राहण्याचा दावा करण्यात येत आहे.

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष आपली रणनीती आखत आहेत. भाजपा आणि मित्रपक्षांकडून सत्तेत कायम राहण्याचा दावा करण्यात येत आहे. तर विरोधी पक्ष भाजपाला सत्तेतून पायउतार करण्याचा दावा करत आहेत. यादरम्यान, विरोधी पक्षांचा पंतप्रधानपदाच्या चेहऱ्यासाठीचा मेगाप्लॅन समोर आला आहे. २३ जूनला पाटणा येथे होणाऱ्या विरोधी पक्षांच्या बैठकीपूर्वी त्याबाबतची माहिती समोर येत आहे. 

मिळत असलेल्या माहितीनुसार २३ जून रोजी होणाऱ्या विरोधी पक्षांच्या बैठकीमध्ये पंतप्रधान पदाच्या चेहऱ्याबाबत कुठलीही चर्चा होणार नाही. तर २०२४ च्या निवडणुकीसाठी अजेंडा निश्चित करण्याचा प्रयत्न केला जाईल. जेडीयू आणि आरजेडी हे बिहारमधील दोन  प्रमुख पक्ष या बैठकीचं आयोजन करणार आहेत. यामध्ये काँग्रेस, द्रमुक, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, आप, समाजवादी पार्टी आणि इतर विरोधी पक्षांचे वरिष्ठ नेते सहभागी होणार आहेत. 

आरजेडीमधील सूत्रांनी सांगितले की, पंतप्रधान पदाच्या उमेदवाराबाबत कुठलीही चर्चा होणार नाही. ही बैठक हे पहिलं पाऊल असेल. त्यात एक संयुक्त अजेंडा तयार केला जाईल. आज महागाई आणि बेरोजगारी हे मुद्दे लोकांचं लक्ष वेधून घेत आहेत. सरकारची आर्थिक बेशिस्त, चुकीचा जीएसटी, नोटाबंदीसारख्या निर्णयामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तसेच सांप्रदायिक सौहार्द, सरकारी एजन्सींचा गैरवापर, लोकशाहीला कमकुवत करणे हे मुद्देही महत्त्वाचे आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार या बैठकीमध्ये किमान समान कार्यक्र सादर करू शकतात. मात्र पंतप्रधान पदाच्या उमेदवाराबाबत कुठलीही चर्चा होणार नाही. ज्येष्ठ नेत्यांची एक टीम स्थापन करण्याबाबत चर्चा होऊ शकते. ही टीम विविध राज्यांमध्ये जाऊन तिथे विरोधी पक्षांचा पाठिंबा मागणार आहे.  

टॅग्स :lok sabhaलोकसभाElectionनिवडणूकNitish Kumarनितीश कुमारRahul Gandhiराहुल गांधीSharad Pawarशरद पवार