शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

"गँगस्टर, शोधूनही सापडणार नाहीत"; राजस्थानमध्ये मुख्यमंत्रिपदाचे दावेदार बाबा बालकनाथांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2023 13:43 IST

तिजारा विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले बाबा बालकनाथ यांच्या नावाचीही जोरदार चर्चा सुरू आहे. 

राजस्थान विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी रविवारी राजभवन गाठून राज्यपाल कलराज मिश्रा यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. आता राजस्थानमधील विजयानंतर भारतीय जनता पक्षाचे नवे सरकार स्थापन होणार आहे. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. याच दरम्यान तिजारा विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले बाबा बालकनाथ यांच्या नावाचीही जोरदार चर्चा सुरू आहे. 

कन्हैया लालच्या हत्येच्या प्रश्नावर बाबा बालकनाथ म्हणाले की, आम्ही या प्रकरणात पूर्ण न्यायपर्यंत पोहोचू. यापूर्वीच्या काँग्रेस सरकारच्या काळात राज्यात महिलांवर अत्याचार झाले. गँगस्टर, गुंड आता शोधूनही सापडणार नाहीत आणि जनतेला न्याय मिळेल, तुम्ही मुख्यमंत्री होणार का, या प्रश्नावर बाबा बालकनाथ म्हणाले की, हा माझा विषय नाही. निवडणूक जिंकणं हे माझं काम होतं आणि आता पुढे सेवा करेन.

उत्तर आणि दक्षिणेच्या राजकारणावर बाबा बालकनाथ म्हणाले की, तेलंगणात मतांची टक्केवारी वाढली आहे. भविष्यात त्याचे चांगले परिणाम दिसून येतील. भाजपा लोकांपर्यंत पोहोचत आहे. नरेंद्र मोदी तिथेही खूप लोकप्रिय आहेत, देशात आणि परदेशात सर्वत्र लोकप्रिय आहेत. हा विजय कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमाचे फळ असून तिजारा विधानसभेच्या जनतेने मला साथ दिली असल्याचं ते म्हणाले. 

या विजयामागचे मुख्य कारण काय, असे त्यांना विचारले असता, गेहलोत यांच्याकडे कोणतीही योजना नसल्याचे त्यांनी सांगितले. ती फक्त खोट्या गोष्टींची पेटी होती, प्रत्यक्षात काहीही नव्हतं. पहिल्या 10 दिवसात शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे ते म्हणाले. आम्हाला सेवा कशी करायची हे माहित आहे. संपूर्ण देश पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली आहे आणि सर्व नेते आणि कार्यकर्ते त्यांच्या पावलावर पाऊल टाकत आहेत असं ही त्यांनी म्हटलं. न्‍यूज 18 हिंदीने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकPoliticsराजकारणBJPभाजपा