शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या युट्यूबर्सना जाळ्यात अडकवणारी 'मॅडम एन' आहे तरी कोण? पहलगाम हल्ल्याशीही कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 15:55 IST

भारतीय सुरक्षा यंत्रणांनी नुकत्याच केलेल्या तपासात, ‘मॅडम एन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिलेशी संबंधित धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था आयएसआयच्या कारवायांबाबत मोठे खुलासे समोर येत आहेत. भारतीय सुरक्षा यंत्रणांनी नुकत्याच केलेल्या तपासात, ‘मॅडम एन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नौशाबा शहाबाद मसूद या महिलेशी संबंधित धक्कादायक माहिती उघड झाली आहे. नौशाबा ही पाकिस्तानच्या आयएसआय आणि लष्करासाठी भारतात स्लीपर सेल आणि हेरगिरीचं जाळं उभारणाऱ्या मुख्य व्यक्तींमध्ये असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोण आहे मॅडम एन?नौशाबा मसूद ही लाहोरस्थित व्यावसायिका असून ती झायना ट्रॅव्हल्स अँड टुरिझम या ट्रॅव्हल कंपनीची मालक आहे. तिचा पती पाकिस्तान सिव्हिल सर्व्हिसमधील निवृत्त अधिकारी आहे. आयएसआयच्या सूचनेनुसार, नौशाबा भारतात ५०० हेरांचं नेटवर्क सक्रिय करण्याच्या कामात तैनात होती.

तपासणीत उघड झालं आहे की, नौशाबा विशेषतः भारतातील हिंदू आणि शीख समुदायातील लोकांना लक्ष्य करत होती. तिने मागील सहा महिन्यांत सुमारे ३००० भारतीय नागरिक आणि १५०० परदेशस्थित भारतीयांना पाकिस्तानात नेण्यात मोठी भूमिका बजावली होती.

सोशल मीडिया इन्फ्लुएंसरचा वापरनौशाबा सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि युट्यूबर्सना पाकिस्तानात आमंत्रित करून, त्यांची ओळख पाकिस्तानी लष्कर व आयएसआय अधिकाऱ्यांशी करून देत होती. युट्युबर ज्योती मल्होत्रालाही तिने पाकिस्तानात नेले होते.

पाकिस्तानी दूतावासात थेट संपर्कतिचा दिल्लीतील पाकिस्तानी दूतावासाच्या व्हिसा विभागावर मोठा प्रभाव होता. ती थेट फर्स्ट सेक्रेटरी व्हिसा सुहेल कमर, ट्रेड कौन्सिलर उमर शेरियार, आणि व्हिसा ऑफिसर असलेल्या आयएसआय एजंट दानिश यांच्याशी थेट संपर्कात होती. तिच्या शिफारसीवरून अनेक भारतीयांना लगेच व्हिसा मिळत होता.

अनधिकृत आर्थिक व्यवहार आणि बँक खात्यांची चौकशीसुरक्षा यंत्रणांना नौशाबाच्या पाकिस्तान नंबरसह तिची दोन बँक खाती देखील मिळाली आहेत. ही खाती भारतीय सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्ससोबत झालेल्या पैशांच्या व्यवहारासाठी वापरले जात होते. याबाबत सध्या तपास सुरू आहे.

भारताशी तांत्रिक नियम मोडणाऱ्या योजनाभारत-पाकिस्तान दरम्यान पर्यटक व्हिसाची कोणतीही अधिकृत प्रक्रिया नसतानाही, नौशाबाच्या शिफारसीवरून ‘स्पॉन्सरशिप व्हिजिटर व्हिसा’ दिला जात होता. ती ईटीपीबीच्या सहकार्याने शीख आणि हिंदू धर्मीयांची यात्रा आयोजित करत होती. यातून ती मोठी आर्थिक कमाई करत होती आणि हा निधी पाकिस्तानच्या प्रचारासाठी वापरला जात होता.

अलीकडेच नौशाबाने दिल्ली व अन्य प्रमुख शहरांमध्ये तिचे एजंट नियुक्त केले होते, जे सोशल मीडियावर तिच्या ट्रॅव्हल एजन्सीचा प्रचार करण्याचे काम करून, लोकांना शोधत होते. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानJyoti Malhotraज्योती मल्होत्रा