शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

Madhavi Latha: ओवेसींविरोधात भाजपाकडून महिलेला उमेदवारी; कोण आहेत माधवी लता? त्यांच्याबद्दल जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2024 17:23 IST

Madhavi Latha : डॉ. माधवी लता विरिंची हॉस्पिटलच्या अध्यक्षा आहेत.

Madhavi Latha: (Marathi News) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. कालच भाजपाने आपल्या एकूण १९५ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यानुसार, तेलंगणामधील चर्चेत असलेल्या हैदराबादच्या जागेवर कोम्पेला माधवी लता यांना उमेदवारी दिली आहे. सध्या या जागेवर एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी खासदार आहेत.

हैदराबाद मतदार संघाची जागा १९८४ पासून ओवेसी कुटुंबाच्या ताब्यात आहे. हैदराबाद हा मतदार संघ ओवेसींचा बालेकिल्ला मानला जातो. असदुद्दीन ओवेसी यांचे वडील सुल्तान सलाउद्दीन ओवेसी १९८४ मध्ये पहिल्यांदा या जागेवरून खासदार झाले. २००४ पर्यंत ते खासदार राहिले आणि त्यानंतर आता ही जागा असदुद्दीन ओवेसी यांच्याकडे आहे.

जाणून घ्या, माधवी लता यांच्याविषयी... 

- डॉ. माधवी लता विरिंची हॉस्पिटलच्या अध्यक्षा आहेत. त्या सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतात. तसेच, अनेकदा हिंदुत्वासाठी त्या आवाज उठवताना दिसून येतात. - हॉस्पिटलच्या अध्यक्षा असण्यासोबतच माधवी लता या भरतनाट्यम नृत्यांगना देखील आहेत. - हैदराबादमध्ये सामाजिक कार्यासाठीही त्या ओळखल्या जातात. त्या ट्रस्ट आणि संस्था आरोग्यसेवा, शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच, माधवी लता या लोपामुद्रा चॅरिटेबल ट्रस्ट आणि लतामा फाउंडेशनच्या प्रमुख आहेत. - माधवी लता यांनी कोटी महिला कॉलेजमधून राज्यशास्त्रात एमए केले. सध्या त्यांची हिंदू धर्मासंबंधीची भाषणे लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. 

- यापूर्वी पक्षाने भागवत राव यांना उमेदवारी दिली होती. मात्र, भागवत यांना ओवेसींकडून सुमारे तीन लाख मतांनी पराभव स्वीकारावा लागला. यानंतर आता हैदराबादमध्ये पहिल्यांदाच भाजपाने महिला उमेदवार रिंगणात उतरविला आहे.

- यंदाच्या लोकसभा निवडणुकीत हैदराबादमध्ये भाजपाने महिला उमेदवार उभे करून लढत चुरशीचा करण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र ओवेसी यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात पराभूत करणे सोपे जाणार नाही. आता ओवेसींच्या बालेकिल्ल्यात हिंदुत्वाचा चेहरा विजयी होणार की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकBJPभाजपाAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन