शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

"बाळासाहेबांच्या बाकी वंशजांना उद्धवस्त करणारा औरंग्या कोण?’’ नितेश राणेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2023 23:52 IST

Nitesh Rane Criticize Uddhav Thackeray: औरंगजेबाच्या मुद्द्यावरून आता उद्धव ठाकरे आणि भाजपा आमनेसामने आलेले दिसत आहेत. काल उद्धव ठाकरें यांनी भाजपाच्या नेत्यांच्या राजकारणाची तुलना औरंगजेबाशी केल्यानंतर आता भाजपा नेत्यांनी उद्धव ठाकरेंविरोधात आघाडी उघडली आहे.

मुंबई - औरंगजेबाच्या मुद्द्यावरून आता उद्धव ठाकरे आणि भाजपा आमनेसामने आलेले दिसत आहेत. काल उद्धव ठाकरें यांनी भाजपाच्या नेत्यांच्या राजकारणाची तुलना औरंगजेबाशी केल्यानंतर आता भाजपा नेत्यांनी उद्धव ठाकरेंविरोधात आघाडी उघडली आहे. त्यात आता ठाकरेंचे कट्टर विरोधक असलेल्या नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला असून, बाळासाहेबांच्या बाकी वंशजांना उद्धवस्त करणारा औरंग्या कोण होता?, असा सवाल विचारला आहे.

यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये नितेश राणे म्हणाले की, मनसेचे सहा नगरसेवक पळविणारा औरंग्या कोण होता? राजसाहेबांना बाळासाहेबांपासून तोडणारा औरंग्या कोण होता?बाळासाहेबांच्या बाकी वंशजांना उद्धवस्त करणारा औरंग्या कोण होता? आता कोठडी दिसायला लागली तर नाती आठवली! अशी कपटी वृत्तीचा खऱ्या औरंग्या कोण? अशी विचारणा नितेश राणे यांनी केली. 

दरम्यान, नितेश राणे यांनी आज सकाळीही उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. मुलाची दिवाळी आर्थर रोड जेलमध्ये जाणार असल्याने बाप म्हणून उद्धव ठाकरे संतापलेत. हा राग ते भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर काढतायेत . उद्धव ठाकरे जे स्वत:च्या वडिलांचे, स्वत:च्या धर्माचे, स्वत:च्या सख्ख्या भावाचे झाले नाहीत ते देवेंद्र फडणवीस यांना नाव ठेवत असेल तर नमकहराम कुणी नाही. देवेंद्र फडणवीसांनी सत्ता काळात भावाप्रमाणे त्यांना सांभाळले. उद्धव ठाकरेंचे मूळ दुखणं भाजपा किंवा देवेंद्र फडणवीस नाही तर  आता ज्या कारवाया होतायेत त्या रवींद्र वायकर, किशोरी पेडणेकर यांच्यावर होतायेत. बाप म्हणून उद्धव ठाकरेंना कळालं आहे, माझा मुलगा जेलमध्ये जाणार आहे. माझ्या मुलाची दिवाळी आर्थर रोड जेलमध्ये होणार आहे त्याचा राग कुणावर काढायचा तर तो भाजपा, देवेंद्र फडणवीस यांच्यावर काढतायेत. कोविड काळात भ्रष्टाचार करायला आम्ही सांगितला होता का? मुलगा जेलमध्ये जाणार ते सहन होत नसल्याने ही कारवाई थांबवू शकत नाही याचा राग उद्धव ठाकरे भाजपा-देवेंद्र फडणवीस यांच्यावर काढताहेत, असा टोला लगावला होता.

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरे