शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

'कार्यक्रमाचे यजमान आहेत तरी कोण?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2020 02:42 IST

काँग्रेस म्हणते ‘डिप्लोमसी’ म्हणजे शोबाजी नाही

नवी दिल्ली/अहमदाबाद : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी येत्या सोमवारी अहमदाबादमध्ये होणाऱ्या ‘नमस्ते ट्रम्प’ या कार्यक्रमाचे नेमके यजमान कोण आहेत आणि यजमानपद सरकारकडे नसेल तर या तीन तासांच्या कार्यक्रमासाठी गुजरात सरकार १२० कोटी रुपये का खर्च करीत आहे, असे प्रश्न काँग्रेसने शनिवारी उपस्थित केले.ट्रम्प यांचा हा कार्यक्रम ‘डोनाल्ड ट्रम्प नागरिक अभिनंदन समिती’ तर्फे आयोजित करण्यात आल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितले होते. त्या अनुषंगाने काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाल यांनी टष्ट्वीट केले: प्रिय पंतप्रधान, परराष्ट्र मंत्रालयाने दिलेली बातमी सहस्यमय आहे. तरी कृपया पुढील गोष्टींचा खुलासा करावा: १. डोनाल्ड ट्रम्प अभिनंदन समितीचे अध्यक्ष कोण आहेत? २.(त्यांनी) ट्रम्प यांना निमंत्रण केव्हा दिले व ते त्यांनी केव्हा स्वीकारले? ३. त्या कार्यक्रमाला ७० लाख लोक उपस्थित राहतील अशी हमी तुम्ही दिली असल्याचे ट्रम्प का बरं सांगत आहेत?आणखी एका टष्ट्वीटमध्ये सुरजेवाल यांनी असेही विचारले: ट्रम्प अभिनंदन समिती सरकारी नसेल तर त्या ३ तासांच्या कार्यक्रमासाठी गुजरात सरकार १२० कोटी का खर्च का करत आहे? दौºयावर येणाºया परदेशी पाहुण्याचा आदरसत्कार करणे ही भारताची परंपरा आहे. पण हेही लक्षात घ्या की, डिप्लोमसी ही सरकारने हाताळायची गंभीर बाब आहे व ती ‘फोटो आॅप’ व ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ची संधी नाही.दरम्यान, या अहमदाबादमध्ये या नागरिक अभिनंदन समितीची पहिली बैठक सरकारी गेस्ट हाऊसवर झाली. त्यात कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. अहमदाबादचे महापौर बिजल पटेल या १० सदस्यीय समितीचे अध्यक्ष आहेत.त्यात अहमदाबादचे हसमुख पटेल व किरिट सोलंकी दोन्ही भाजपा खासदार, नामवंत आर्किटेक्ट पद्मभूषण बी. व्ही. दोशी, गुजरात विद्यापीठाचे कुलगुरु हिमांशु पंड्या व गुजरात चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इन्डस्ट्रीचे अध्यक्ष दुर्गेश बुच यांच्यासह इतर सदस्य आहेत.सुरजेवाला यांनी केलेल्या टष्ट्वीटविषयी विचारता महापौर बिजल पटेल यांनी त्यातील आरोप तद्दन बिनबुडाचे असल्याचे सांगितले.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पcongressकाँग्रेस