शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: मतमोजणीला सुरूवात; सुरुवातीच्या कलांमध्ये NDA आघाडीवर
2
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावे उघड
3
दिल्लीत स्फोट घडवणाऱ्यांना कडक इशारा; मास्टरमाईंड डॉ. उमरचे पुलवामातील घर IED स्फोटकांनी उडवले!
4
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
5
“अजित पवार सत्तेसाठी लाचार असल्याने ते सत्तेतून बाहेर पडण्याचा प्रश्नच नाही”; काँग्रेसची टीका
6
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
7
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
8
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
9
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
10
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
11
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
12
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास, कोण आहेत ते?
13
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
14
डाॅक्टरसाहेब, मधुमेह होऊच नये, यासाठी काय करावे? चाळिशीनंतर करा नियमित तपासणी
15
आता झोपडीधारकाची संमती गरजेची नाही, झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी सलग ५० एकर क्षेत्रावर होणार समूह पुनर्विकास
16
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
17
यंदाचा कुंभमेळा पाच पट अधिक मोठा, ५,६५८ कोटींच्या कामांचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमिपूजन
18
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
19
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
20
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
Daily Top 2Weekly Top 5

व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 06:32 IST

Delhi Raid Update: दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील शक्तिशाली स्फोट व  व्हाइट कॉलर दहशतवादी मॉड्यूलशी संबंधित लोकांचा शोध घेण्यासाठी जम्मू-काश्मीर पोलिसांच्या काउंटर इंटेलिजेन्स शाखेने(सीआयके) गुरुवारी काश्मीर खोऱ्यात अनेक ठिकाणी छापे टाकले.

श्रीनगर -  दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील शक्तिशाली स्फोट व  व्हाइट कॉलर दहशतवादी मॉड्यूलशी संबंधित लोकांचा शोध घेण्यासाठी जम्मू-काश्मीर पोलिसांच्या काउंटर इंटेलिजेन्स शाखेने(सीआयके) गुरुवारी काश्मीर खोऱ्यात अनेक ठिकाणी छापे टाकले. याप्रकरणी सीआयकेने आतापर्यंत १३ ठिकाणी छापे टाकल्याचा दावा अधिकाऱ्याने केला आहे. कारवाई दरम्यान १५ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात डिजिटल उपकरणे व आक्षेपार्ह साहित्य जप्त केले आहे. 

दिल्लीस्फोटानंतर तपास संस्थांनी आतापर्यंत डॉक्टरांसह ८ जणांना अटक केली असून, २०० हून अधिक लोकांची चौकशी केली आहे. या महिन्याच्या सुरुवातील अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांकडून माहिती मिळाल्यावर तपास संस्थांनी व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्युल भंडाफोड केला.

टायर फुटल्याने दहशतनैर्ऋत्य दिल्लीच्या महिपालपूर क्षेत्रात गुरुवारी अचानक एका बसचे टायर फुटल्यानंतर मोठा आवाज झाल्याने स्थानिक लोकांमध्ये दहशत पसरली. सोमवारी शहरातील लाल किल्ल्यानजीक शक्तिशाली स्फोट झाल्याची घटना ताजी असताना हा प्रकार घडल्यामुळे लोक भयभीत झाले. सकाळी ९ वाजून १९ मिनिटांच्या सुमारास महिपालपूरच्या रेडिसननजीक स्फोट झाल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन विभागाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले. 

स्फोटांसाठी आणखी कार खरेदी करणार होतेव्हाइट कॉलर मॉड्यूलच्या कटानुसार सध्या चार कार सापडल्या आहेत. त्या विविध ठिकाणी स्फोटके वाहून नेण्यासाठी वापरल्या जाणार होत्या. इतर ठिकाणी स्फोटके वाहून नेण्यासाठी अधिक कार खरेदी करण्याचे लक्ष्य होते. स्फोटातील डॉ. उमर व मुजम्मिल याने २०२१पासून तुर्कीच नव्हे तर नेपाळ, यूएई आणि सौदी अरेबियालाही भेटी दिल्या होत्या. ३१ ऑक्टोबर रोजी जम्मू-काश्मीरमध्ये शकीलला, ६ नोव्हेंबर रोजी राथेरला अटक व ८ ते १० नोव्हेंबर दरम्यान फरिदाबादमध्ये पोलिसांच्या छाप्यामुळे तो घाबरला होता.

ब्रिटनच्या उपपंतप्रधान, मंत्र्यांकडून शोक व्यक्त दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील शक्तिशाली स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांबद्दल ब्रिटनचे उपपंतप्रधान डेव्हिड लॅमी व हिंदी-प्रशांत प्रकरणाचे भारतवंशीय ब्रिटिश मंत्री सीम मल्होत्रा यांनी शोक व्यक्त केला.सोमवारी रात्री दिल्लीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे प्रभावित झालेल्या सर्व लोकांबद्दल संवेदना व्यक्त करतो, असे नमूद करत लॅमी यांनी स्फोटातील मृतांबद्दल दु:ख व्यक्त केले. बुधवारी लंडनमध्ये आयोजित एका विशेष कार्यक्रमात बोलताना त्यांनी संवेदना व्यक्त केल्या.

अब्दुल्ला म्हणाले, प्रत्येक काश्मिरी दहशतवादी नाही  जम्मू : दिल्लीतील स्फोटांबाबत जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला म्हणाले की, “जम्मू-काश्मीरमधील प्रत्येक व्यक्ती दहशतवादी नसतो.” काही मोजक्या लोकांच्या कृत्यांमुळे संपूर्ण प्रदेशातील लोकांना दोषी धरणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले.कोणताही धर्म अशा हिंसेस परवानगी देत नाही. जम्मू आणि काश्मीरमधील प्रत्येक जण दहशतवादी नाही किंवा दहशतवाद्यांशी संबंधित नाही. काही व्यक्तींनी नेहमीच येथील शांतता व सौहार्द बिघडविण्याचा प्रयत्न केला आहे, असे त्यांनी सांगितले. 

English
हिंदी सारांश
Web Title : White Collar Terror Module: Raids at 13 Locations in Kashmir

Web Summary : J&K police raided 13 Kashmir locations linked to a white-collar terror module after the Delhi blast. Fifteen were detained, digital devices seized. The module aimed to use cars for explosions, with suspects having foreign travel history. Officials condemn the violence.
टॅग्स :delhiदिल्लीBlastस्फोटJammu Kashmirजम्मू-काश्मीर