कुजबूज--१३ फेब्रुवारी कुजबूज
By Admin | Updated: February 13, 2015 23:11 IST2015-02-13T23:11:15+5:302015-02-13T23:11:15+5:30
अविकसित पुस्तिका

कुजबूज--१३ फेब्रुवारी कुजबूज
अ िकसित पुस्तिका....................................डिचोली मतदारसंघात भाजपमधील काहीजणांनी एक विकास पुस्तिका नुकतीच प्रकाशित केली. आता आलेली विकास पुस्तिका ही पाहण्याजोगी आहे; कारण त्या पुस्तिकेत अनेक विकासकामांचे फोटो आहेत, पण डिचोलीचे प्रतिनिधित्व विधानसभेत सावळ हे करत असतानाही नेमकी सावळ यांच्या फोटोला कात्री लावली गेली. सावळ फोटोत जिथे उभे होते, तोच भाग फोटोतून वगळलाय.सावळ व बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांचे संबंध अत्यंत चांगले आहेत. लाटंबार्से येथे दोन मुख्य रस्ते सावळ यांनी ढवळीकर यांच्याकडे आग्रह धरून करून घेतले. विकास पुस्तिकेत त्या रस्त्यांचा उल्लेख करताना सावळ यांचा उल्लेख मात्र नाही. मतदारांनी मते देऊन सावळ यांना निवडून दिले आहे. गृह आधार, लाडली लक्ष्मी या शासकीय योजनांचा लाभ सावळ हे लोकांना मिळवून देतात; पण विकास पुस्तिकेत त्याचे श्रेय आमदाराला नाही. पुस्तिका थोडी अविकसित राहिल्याचे सावळ यांच्या कार्यकर्त्यांना वाटते. मेणकुरेत सहा महिन्यांत मैदान बांधून होईल, असे पायाभरणीवेळी सांगितले गेले होते; पण एक वर्ष झाले तरी, मैदानाबाबत काहीच विकास नाही. तरीही मैदानाच्या पायाभरणीचा विकास पुस्तिकेत फोटो झळकतो. ...............................थोडी धास्तीच...२०१२ आणि २०१४ च्या तुलनेत शुक्रवारी पणजी मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी मतदान कमी झाले. २०१२ साली ७७.१३ टक्के, तर २०१४ साली ७३.२७ टक्के मतदान झाले होते. त्या तुलनेत आता मतदान थोडे कमी झाले. यामुळे भाजप कार्यकर्त्यांच्या एका गटात धास्ती आहे. दुसरा गट मात्र भाजपचा विजय निश्चित, असा दावा करतो. त्या गटाने सांतइनेज, बोक द व्हाक आदी भागांत फटाकेही लावले. म्हणजे मतमोजणी व निकालापूर्वीच आनंद साजरा केला. काँग्रेसचे कार्यकर्ते व नेत्यांमध्येही दोन गट आहेत. एका गटास फुर्तादो यांना खूप कमी मते मिळतील असे वाटते, तर दुसरा गट फुर्तादो जिंकतील, असे मानतो. भाजप उमेदवार जिंकलाच तर केवळ पाचशे मतांनी, असेही काँग्रेसमधील हा गट सांगतो. लोकसभा निवडणुकीवेळी रवी नाईक यांनी पणजीत काहीच प्रचार केला नव्हता; पण त्यांना साडेचार हजार मते मिळाली होती. आता काँग्रेसने पणजीत प्रचार काम जोरात केल्याने फुर्तादो यांना साडेपाच हजार मते मिळणार नाहीत काय, असे काँग्रेसमधील काहीजण विचारतात.......................