कुजबुज

By Admin | Updated: September 7, 2015 23:27 IST2015-09-07T23:27:42+5:302015-09-07T23:27:42+5:30

Whisper | कुजबुज

कुजबुज

>राजकारणी व कादंबरी

गोव्याचे सभापती राजेंद्र आर्लेकर हे जरी साहित्यिक नसले तरी निश्चितच प्रभावी वक्ते आहेत. त्यांची भाषणे ऐकणे म्हणजे एकप्रकारचा आनंदच असतो. सोमवारी मडगावात एका कवितासंग्रहाचे उद्घाटनासाठी आले असता आर्लेकर म्हणाले, साहित्यिकांनी विषयांच्या र्मयादेत स्वत:ला गुरफटून घेऊ नये. याबद्दलचे उदाहरण देताना ते म्हणाले, गोव्यातील राजकारणावरही चांगली कादंबरी येऊ शकते. सध्या आर्लेकर हेच विधानसभेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या नाकासमोरच कित्येक घटना घडत आहेत. त्याचे ते साक्षीदारही. अशावेळी आर्लेकर यांनीच ही कादंबरी लिहिण्यास हाती घेतली तर बराच मसाला त्यातून बाहेर येऊ शकतो. एक पथ्य मात्र त्यांनी पाळण्याची गरज आहे. विधानसभेत स्वपक्षीयांना सांभाळण्यासाठी विरोधकांचा काहीवेळा आवाज बंद करणार्‍या आर्लेकरांनी हीच पध्दती या कादंबरीत वापरली तर मात्र कादंबरीचा पचका होईल हे नक्की.

Web Title: Whisper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.