कुजबूज
By Admin | Updated: July 31, 2015 23:03 IST2015-07-31T23:03:19+5:302015-07-31T23:03:19+5:30
जमलं तर नोकरी..

कुजबूज
ज लं तर नोकरी..मडगाव पालिकेचे कर्मचारी पालिकेच्या कामाला वेळ देण्यापेक्षा वैयक्तिक कामांना जास्त वेळ देतात. काहींची स्वत:ची दुकाने आहेत तर काहीजण खासगी कंत्राट घेतात. या कर्मचार्यांवर पालिकेने आता पाळत ठेवली आहे. किती कर्मचारी पालिकेत कामासाठी वेळ देतात हे तपासून पाहण्यात येणार आहे. पालिकेला आता या कर्मचार्यांबद्दल माहिती मिळाली आहे. अनेक जण पालिकेत येऊन फिंगर स्कॅन मशीनवर बोट लावल्यानंतर वैयक्तिक कामे करण्यासाठी जातात. या कर्मचार्यांपैकी काहीजण पालिका कर्मचार्यांनाच व्याजाने कर्ज देतात. आता बोला!