कुजबूज
By Admin | Updated: June 2, 2015 00:03 IST2015-06-02T00:03:55+5:302015-06-02T00:03:55+5:30
बाणावलीच्या बिळात...

कुजबूज
ब णावलीच्या बिळात... मिकी पाशेको शरण येताना थेट दिल्लीहून गोव्यात आल्याचे जरी सांगितले असले तरी मागचा आठवडा ते मित्राच्या बाणावली येथील एका रिसॉर्टमध्ये लपले होते, अशी बातमी कुजबुजकरांच्या हाती लागली आहे. हा रिसॉर्टवाला यापूर्वी मिकीशी राजकीय संबंध ठेवूनही होता. त्यापूर्वी म्हणे १५ दिवस मिकीने करमळीच्या एका बिळात आसरा घेतला होता. सोमवारी जेव्हा मिकी न्यायालयात शरण आले त्या वेळी त्यांची गाडी बाणावलीमार्गे कोंबातून न्यायालयात आली होती आणि त्यांच्याबरोबर एक माणूस होता तो सुध्दा बाणावलीकरच होता. एवढा बाणावलीत असताना मिकी गोवा पोलिसांच्या हाती कसा लागू शकला नाही? याचे उत्तर आता आयरिश यांच्याकडेच मागावे लागेल.अब तेरा क्या होगा मिकी?सडा तुरुंगातील कैद्याकडून एखाद्यावेळी मार खावा लागेल या भीतीनेच पाशेको मागचे दोन महिने दडी मारून बसले होते, असे सांगण्यात येते. कोलवाळचा नवा तुरुंग सुरू झाल्यानंतर पाशेको शरण येतील, असे ॲड. आयरिश रॉड्रिग्स छाती फोडून सांगायचे. ३0 मे रोजी या तुरुंगाचे उद्घाटन झाले आणि १ जून रोजी मिकी शरण आले. आता ही घटना बोला फुलाला पडलेली गाठही असू शकते; पण न्यायालयाने पाशेकोंची रवानगी सडा तुरुंगातच केली आहे. अब तेरा क्या होगा मिकी?