कुजबूज

By Admin | Updated: September 7, 2015 23:27 IST2015-09-07T23:27:39+5:302015-09-07T23:27:39+5:30

फाईलला झेड सुरक्षा

Whisper | कुजबूज

कुजबूज

ईलला झेड सुरक्षा
हा किस्सा आहे एका आयपीएस बनलेल्या गोव्याच्या पोलीस अधिकार्‍याचा. आयपीएस केडरमध्ये समाविष्ट केल्यापासून ते बर्‍याच वादात सापडले होते. त्यातच त्यांची एक महत्त्वाची फाईल होती. ती मंजूर करण्यासाठी पोलीस खात्यात योग्य माध्यमातून जावी लागते. इंग्रजीत त्याला प्रॉपर चॅनल असे म्हणतात. तो चॅनल या अधिकार्‍याने पाळलाच; परंतु त्या फाईलबरोबर एक माणूसही ठेवला. हा माणूस म्हणजेच अर्थात पोलीस कॉन्स्टेबलच होता हे वेगळे सांगायला नको. फाईल ज्या कार्यालयात, ज्या टेबलवर, ज्या अधिकार्‍याकडे जाईल तेथे हा माणूस जातीने हजर राहायचा. शेवटी ती फाईल पोलीस महासंचालकांच्या कार्यालयात गेली, मात्र माणूस गेला नाही. एवढी झेड सुरक्षा या फाईलला का देण्यात आली? एवढे काय दडले आहे त्या फाईलमध्ये, अशी चर्चा अजून सुरू आहे.

Web Title: Whisper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.