कुजबूज

By Admin | Updated: September 6, 2015 23:54 IST2015-09-06T23:54:52+5:302015-09-06T23:54:52+5:30

पॅराग्लायडिंगसाठी ओळखपत्रे

Whisper | कुजबूज

कुजबूज

राग्लायडिंगसाठी ओळखपत्रे
अतिरेकी गोव्यात येऊन पॅराग्लायडिंग करत असल्याचे उघड झाल्याने आता गोव्यात सुरक्षा यंत्रणा सतर्क बनल्याचे सांगितले जाते. भाडेकरूला जसे सी फॉर्म भरणे आवश्यक आहे, तसे पॅराग्लायडिंग करण्यासाठी संबंधितास ओळखपत्र देणे सक्तीचे करण्याचा विचार सध्या चालू आहे, असे एका बड्या अधिकार्‍याने सांगितले. उद्या एखाद्या किनार्‍यावर अतिरेकी सापडला तर किनार्‍यावर फिरण्यासाठी ओळखपत्रे, थिएटरमध्ये येऊन चित्रपट पाहिल्याचे उघडकीस आल्यास थिएटरमध्ये ओळखपत्र सक्तीचे करू, हे अगोदरच ठरवून ठेवल्याचे एका अधिकार्‍याने सांगितले.

त्यांची रणनीती
लुईस बर्जर प्रकरणातील तपासात संपूर्ण क्राईम ब्रँच व्यस्त आहे, असे सांगितले जात असले तरी ठराविक अधिकारीच याबाबत धावपळ करताना दिसत आहेत. काही अधिकारी यात फारसे काम करताना दिसत नाहीत. याचे कारण जाणण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती क्राईम ब्रँचची रणनीती आहे, अशी माहिती मिळाली. काही अधिकार्‍यांना कोणतेही कामच न देणे ही रणनीती कशी होऊ शकते, असा प्रश्न पडणे सहाजिक आहे. जास्त आचारी जेवणाची वाट लावतात, या अर्थाच्या इंग्रजी म्हणीचा एका अधिकार्‍याने उल्लेख केला.

Web Title: Whisper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.