शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
2
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
3
श्रेयस अय्यरला झालेली दुखापत किती गंभीर, आता कशी आहे प्रकृती? बीसीसीआयने दिली महत्त्वाची माहिती
4
युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला! १९३ ड्रोनमधून गोळीबार, मॉस्कोतील दोन विमानतळ बंद
5
'वॉशिंग्टन पोस्ट'चा अहवाल LIC ने फेटाळला; अदानी समूहात फक्त ४% गुंतवणूक, मग सर्वाधिक पैसा कुठे?
6
Mid-Size SUV: २० लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये घरी आणा 'या' ५ जबरदस्त मिड- साइज एसयूव्ही कार!
7
Video: घरात अन् महाराष्ट्रात जिथं असाल तिथे मराठीत बोला, नाहीतर...; अजित पवारांचं आवाहन
8
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
9
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
10
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट
11
Mumbai Crime: "शेवटचे दिवस जवळ आलेत", भावेश शिंदे घरातून बाहेर पडला आणि मुंबई लोकलखाली संपवले आयुष्य
12
Desi Jugaad: तरुणांची चपाती फुगवण्याची सीक्रेट ट्रिक व्हायरल; व्हिडीओ पाहून महिलांची उडेल झोप!
13
निष्काळजीपणाचा कळस! रुग्णालयात महिलेला लावलं एक्सपायर्ड ग्लुकोज, तोंडातून फेस आला अन्...
14
बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीतच भाजपची मोठी कारवाई, चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; करण्यात आले गंभीर आरोप
15
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
16
“महायुतीचे शेतकरी पॅकेज थोतांड, कर्जमाफी करावी; राज्य दिवाळखोरीत काढले”: हर्षवर्धन सपकाळ
17
EPF खातेधारकांना मोठी भेट! 'फ्री'मध्ये मिळतोय ₹७ लाखांपर्यंतचा जीवन विमा; कुटुंबाला मिळेल मोठा आधार
18
२० वर्षीय भारतीय तरुणीवर ब्रिटनमध्ये बलात्कार, आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद; वर्णद्वेषातून कृत्य
19
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा

तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 13:04 IST

..हा ट्रम्प यांना मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.

रशियाकडून तेल खरेदी करत असल्याच्या कारणाने ट्रम्प प्रशासनाने भारतावर ५०% पर्यंत आयात शुल्क (टॅरिफ) लादले होते. यामुळे भारतीय व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र, आता भारताकडून चीनला होणाऱ्या निर्यातीत लक्षणीय वाढ झाली असून, हा ट्रम्प यांना मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. भारताकडून चीनला होणाऱ्या निर्यातीत सुमारे २२ टक्के वाढ झाली आहे.

यासंदर्भात 'हिंदुस्तान टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत भारताकडून चीनला होणाऱ्या निर्यातीत सुमारे २२% एवोढी वाढ झाली आहे. यात प्रामुख्याने टेलीफोन सेट, झिंगा, ॲल्युमिनियम आणि शिमला मिरचीसारख्या वस्तूंचा समावेश आहे. भारत आणि चीन यांच्यातील संबंधांमध्ये झालेल्या सुधारणांचा आणि चीनच्या भारताप्रती बदललेल्या सकारात्मक दृष्टिकोनाचा हा परिणाम असल्याचे दिसते.

झिंगा उद्योगाला मोठा दिलासा -ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे भारताच्या झिंगा उद्योगाला मोठा फटका बसला होता. टॅरिफमुळे अमेरिका-भारत हवाई मालवाहतूक निर्यातीत १४% नी घट झाली होती, तर एकट्या आंध्र प्रदेशातील झिंगा उद्योगाला २५,००० कोटी रुपयांचे नुकसान होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. एवढेच नाही तर, ५०% पर्यंत ऑर्डर्स रद्दही झाल्या होत्या. मात्र, चिनी बाजारपेठेतील भारतीय मालाला  वाढत्या मागणीने या उद्योगाला मोठा आधार मिळाला आहे.

काय म्हणाले चिनी राजदूत -भारतातील चीनचे राजदूत श फीहोंग यांनी या सकारात्मक व्यापारवृद्धीबद्दल 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत आनंद व्यक्त केला आहे. या पोस्टमोध्ये त्यांनी लिहिले, "२०२५-२६ या अर्थवर्षाच्या पहिल्या सहामाहीत भारताकडून चीनला होणारी निर्यात २२% वाढली आहे. चीन भारतीय 'प्रीमियम' वस्तूंना आपल्या बाजारपेठेत अधिकाधिक जागा देईल." 

ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणानंतर, चीनच्या बाजारपेठेत भारताची निर्यात वाढणे, हा भारतीय अर्थव्यवस्थेसाठी एक महत्त्वाचा सकारात्मक बदल आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : India Counters Trump's Tariffs with China Trade Boost, Gains Big!

Web Summary : Despite Trump's tariffs, India's exports to China surged 22%, benefiting key sectors like shrimp and aluminum. Increased demand in the Chinese market offsets losses from US tariffs, marking a positive shift for India's economy and trade relations.
टॅग्स :IndiaभारतchinaचीनAmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प