शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! तलावात बुडणाऱ्या लोकांना वाचवताना जवानाच्या हाती लागला त्याच्याच आईचा मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 12:37 IST

Big accident in dantewada: या भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला तर 19 जण जखमी झाले आहेत.

दंतेवाडा:छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात सोमवारी एक ट्रॅक्टर ट्रॉली तलावात कोसळली. या भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला तर 19 जण जखमी झाले आहेत. यादरम्यान एक ह्रदयद्रावक घटना घडली आहे. ट्रॅक्टर तलावात कोसळल्यानंतर, त्याच परिसरात सर्च ऑपरेशनसाठी आलेली DRG (डिस्ट्रिक्ट रिजर्व ग्रुप) च्या पथकानं बुडणाऱ्या लोकांना वाचवण्यासाठी तलावात उड्या मारल्या. यावेळी बचाव कार्यातील एका जवानाच्या हाती त्याच्याच आईचा मृतदेह लागला. विशेष म्हणजे, या अपघातात त्याचीही आई पाण्यात पडली आहे, हे त्याला माहित नव्हते.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, फूके कवासी नावाची महिला दंतेवाडा जिल्ह्यातील कटेकल्याण ब्लॉकच्या टेटमची रहिवासी होती. ही महिला गावातील 25-30 लोकांसोबत आदिवासी दिवसावर आयोजित एका कार्यक्रमासाठी हीरानारकडे जात होती. हे सर्व लोक एका ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये बसले होते. यावेळी अचानक चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर बाजुच्या तलावात कोसळला. 

या अपघातावेळी DRG च्या जवानांचे तेलम-टेटम परिसरात सर्च ऑपरेशन सुरू होते. त्यांना या अपघातातील जखमींचा आवाज ऐकू आला. त्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली आणि पाण्यात उड्या मारुन लोकांना वाचवणे सुरू केले. यावेळी या पथकातील जवान वसू कवासीला ट्रॅक्टरखाली कुणीतरी अडकल्याचे जाणवले. 

कवासीच्या हातात एका महिलेचा मृतदेह आला. त्याने त्या महिलेला बाहेर काढल्यानंतर त्याला खूप मोठा धक्का  बसला. हातात आपल्या आईचा मृतदेह पाहून तो ओक्साबोक्शी रडू लागला. विशेष म्हणजे आपली आईदेखील या ट्रॅक्टरमध्ये होती, हे त्याला माहित नव्हते. या ह्रदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने परिसरातील सर्वांनाच धक्का बसला आहे. दरम्यान, अपघातात फूके कवासी यांच्यासह 9 वर्षीय दिनेश मरकाम, 16 वर्षीय दसई कवासी आणि 35 वर्षीय कोसा माडवीचा मृत्यू झाला आहे, तर 19 जण जखमी झाले आहेत.

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडAccidentअपघात