शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अरे देवा! लग्नाचा मांडव सजला, नवरदेव वाट पाहत राहिला; पण नवरी बॉयफ्रेंडसोबत पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 16:14 IST

एक नवरदेव मुंडावळ्या बांधून आणि शेरवानी घालून लग्नासाठी नवरीची वाट पाहत बसला होता, परंतु नवरी आपल्या बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

बिहारच्या बांका जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एक नवरदेव मुंडावळ्या बांधून आणि शेरवानी घालून लग्नासाठी नवरीची वाट पाहत बसला होता, परंतु नवरी आपल्या बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जेव्हा ही बाब नवरदेव आणि नवरीच्या कुटुंबीयांना समजली, तेव्हा सर्वांच्या पायखालची जमीन सरकली. 

शंभूगंज प्रखंड क्षेत्रातील एका गावात राहणाऱ्या तरुणीचं लग्न मुंगेर जिल्ह्यातील रघुनाथपूर येथील रहिवासी अमित कुमार याच्याशी ठरलं होतं. दोन्ही कुटुंबात आनंदाचं वातावरण होतं. लग्नासाठी मुंगेर जिल्ह्यातील तारापूर येथील प्रसिद्ध 'उल्टा महादेव मंदिर' निवडण्यात आलं होतं. ठरलेल्या वेळेनुसार नवरदेव आणि त्याचे नातेवाईक मंदिरात पोहोचले. मंदिरात पाहुण्यांचं स्वागतही झालं. नवरदेव नवरी येण्याची वाट पाहत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, अनेक तास उलटूनही नवरी मंदिरात पोहोचली नाही. त्यामुळे नवरीच्या कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. याच दरम्यान समजलं की, होणारी नवरी शंभूगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या विकास कुमार नावाच्या आपल्या बॉयफ्रेंडसोबत पळून गेली आहे. ही बातमी मिळताच नवरदेवाला मोठा धक्का बसला, तर मुलीचे घरचेही सुन्न झाले.

मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी शंभूगंज पोलीस ठाणे गाठलं. मुलीच्या वडिलांनी आणि नातेवाईकांनी अशी शंका व्यक्त केली आहे की, त्यांची मुलगी स्वतःच्या इच्छेने गेलेली नाही, तर तिला लग्नाच्या आमिषाने फूस लावून पळवून नेण्यात आलं आहे. त्यांनी पोलिसांकडे आपल्या मुलीचा लवकरात लवकर शोध घेण्याची विनंती केली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Groom Waits as Bride Elopes with Boyfriend on Wedding Day

Web Summary : In Bihar, a bride eloped with her boyfriend on her wedding day, leaving the groom waiting at the altar. The family suspects foul play and has filed a police complaint.
टॅग्स :BiharबिहारPoliceपोलिसmarriageलग्न