शहरं
Join us  
Trending Stories
1
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
2
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
3
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
4
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
5
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
6
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
7
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
8
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
9
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
10
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
11
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
12
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
13
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
14
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
15
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
16
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
17
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
18
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
19
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
20
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'

काँग्रेसनं कोणत्या मार्गावर चालायला हवं? राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं, ओढली 'लक्ष्मणरेषा'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 02:43 IST

...दरम्यान, राहुल गांधी यांनी पक्षासाठी एक लक्ष्मणरेषाच आखून टाकली. काँग्रेसने कोणत्या मार्गावर चालायला हवे, हे त्यांनी सांगितले. जात निहाय जनगणना असो अथवा आरक्षण, कशा प्रकारे पुढे जायला हवे? यावर त्यांनी भाष्य केले. 

हरियाणानंतर महाराष्ट्रात झालेल्या दारून पराभवाने काँग्रेस अस्वस्थ झाली आहे. जेथे विजयाची अपेक्षा होती, तेथे एवढा दारुण पराभव कसा झाला? हे त्यांना अजूनही समजेनासे झाले आहे. शुक्रवारी झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत हाच मुद्दा गाजला. दरम्यान, राहुल गांधी यांनी पक्षासाठी एक लक्ष्मणरेषाच आखून टाकली. काँग्रेसने कोणत्या मार्गावर चालायला हवे, हे त्यांनी सांगितले. जात निहाय जनगणना असो अथवा आरक्षण, कशा प्रकारे पुढे जायला हवे? यावर त्यांनी भाष्य केले. एवढेच नाही, तर संभल आणि अजमेरच्या मुद्द्यांवरही पक्षाकडून स्पष्ट भूमिका घेण्यात आली आहे.

सूत्रांच्या हवाल्याने न्यूज18 ने दिलेल्या वृत्तानुसार, पक्षाच्या नेत्यांना संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले, "निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित करावे लागतील, कारण संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शक नाही. आपण जात निहाय जनगणना आणि आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांनी वाढवण्यासंदर्भात स्पष्ट भूमिका घेतली. तर भाजप अस्वस्थ झाला. त्याच्याकडे काहीही उत्तर नाही. याच पद्दतीने संभलसह सर्वच मुद्द्यांवर आपण स्पष्ट भूमिका घ्यायला हवी." यानंतर काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी सीडब्ल्यूसी बैठकीत मंजूर झालेल्या प्रस्तावांची माहिती दिली.

"प्लेसेज ऑफ वर्शिप अॅक्‍टचा सन्मान व्हयला हवा" -वेणुगोपाल म्हणाले, काँग्रेस कार्यकारिणीने एक ठराव मंजूर केला आहे. यात, भाजप यूपीसह संपूर्ण देशात सांप्रदायिक तणाव वाढवण्याचे काम करत असल्याचे म्हणण्यात आले आहे. 1991 च्या प्लेसेज ऑफ वर्शिप अॅक्‍टचा सन्मान व्हयला हवा. याशिवाय, या बैठकीत पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा यांनी EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याचा मुद्दा उपस्थित केला. भारताने इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) ऐवजी पारंपरिक बॅलेट पेपरकडे परतावे. या गोष्टीत इतर कुठलाही मध्यम मार्ग असू शकत नाही, असे प्रियंका गांधी म्हणाल्या. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग