Electoral Bonds: नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने कडक शब्दांत सुनावल्यानंतर अखेर भारतीय स्टेट बँकेने गुरुवारी निवडणूक रोखे संदर्भातील सर्व माहिती निवडणूक आयोगाच्या स्वाधीन केली आणि नंतर लगेच आयोगाने ती माहिती आपल्या संकेतस्थळावर सार्वजनिक केली. या माहितीत युनिक अल्फान्यूमरिक नंबरचा समावेश आहे, ज्यावरून कोणत्या कंपनीने कोणत्या राजकीय पक्षाच्या नावे किती रकमेचे निवडणूक रोखे खरेदी केले आणि संबंधित राजकीय पक्षाने त्यापैकी किती रोख्यांचे रोखीकरण केले, याबाबतची संपूर्ण माहिती मिळते. सार्वजनिक करण्यात आलेल्या याच ताज्या आकडेवारीचे विश्लेषण करण्यात आल्यानंतर जे काही हाती लागले, ते येथे देत आहोत...
- निम्म्यापेक्षा जास्त देणग्या भाजपला- हैदराबाद येथील ‘मेघा इंजिनीअरिंग’ या कंपनीने भाजपला सर्वाधिक ५८४ काेटी, ‘क्विक सप्लाय चेन’ या कंपनीने ३७५, ‘वेदांता’ने २३० काेटी आणि ‘भारती एअरटेल’ने १८३ काेटी रुपयांची देणगी दिली.
- काँग्रेसला काेणी-काेणी दिल्या देणग्या?- काँग्रेसला सर्वाधिक देणगी ‘वेदांता’ने दिली. ‘वेदांता’ने १२५ काेटी, ‘एम. के. जे. एंटरप्रायजेस’ने १२० काेटी आणि ‘वेस्टर्न यूपी पाॅवर ट्रान्समिशन’ने ११० काेटी रुपयांची देणगी राेख्यांच्या माध्यमातून मिळाली.
- तृणमूल काँग्रेसला किती?- तृणमूल काँग्रेसला ५४२ काेटी रुपयांची सर्वाधिक देणगी फ्युचर गेमिंग अँड हाॅटेल सर्व्हिसेस या कंपनीने दिली आहे. त्याखालाेखाल २८ काेटी रुपये हल्दीया एनर्जीने राेख्यांच्या माध्यमातून दिले.
- व्यक्तिश: दिलेल्या बहुतेक देणग्या भाजपच्या पदरात
- एल. एन. मित्तल यांनी भाजपला दिले ३५ कोटी रुपये
(रक्कम कोटींत)
पक्षनिहाय देणगीदार आणि रक्कम
- बीजेडी
एस्सेल मायनिंग १७४.५जिंदाल स्टील व पाॅवर १००उत्कल ॲल्युमीना ७०रुंगटा सन्स ५०एस. एन. माेहांती ४५रश्मी सिमेंट ४५वेदांता ४०पेंग्विन ट्रेडिंग ३०.५जिंदाल स्टेनलेस ३०रश्मी मेटालिक्स २७इतर १६३.५
- बीआरएस
मेघा इंजिनीअरिंग १९५यशाेदा हाॅस्पिटल ९४चेन्नई ग्रीनवूड्स ५०डाॅ. रेड्डीज लॅब ३२हेटेराे ड्रग्ज ३०आयआरबी एमपी एक्स्प्रेस-वे २५ऑनर लॅब्स २५एनएसएल एसइझेड २४.५एल७ हायटेक २२इतर ६९३
- डीएमके
फ्युचर गेमिंग ५०३मेघा इंजिनीअरिंग ८५इतर ४४
- वायएसआरसीपी
फ्युचर गेमिंग १५४मेघा इंजिनीअरिंग ३७रॅम्काे सिमेंट २४ऑस्ट्राे जैसलमेर १७ऑस्ट्राे मध्य प्रदेश विंड १७स्नेहा कायनेटिक पाॅवर १०इतर ६९.८
- टीडीपी
शिर्डी साई इलेक्ट्रिकल्स ४०मेघा इंजिनीअरिंग २८वेस्टर्न यूपी पाॅवर २०नॅटकाे फार्मा १४डाॅ. रेड्डीज १३भारत बायाेटेक १०इतर ८६.६
बी.जी. शिर्के कन्स्ट्रक्शन ८५क्विक सप्लाय २५इतर ४२.५
- जेडीएस
नारा कन्स्ट्रक्शन १०रित्त्विक प्राेजेक्ट १०इतर २१
- आरजेडी
आयएमबी ॲग्राे ३५इतर ३७.५
क्विक सप्लाय चेन १०इतर १८.५
- आप
अवीस ट्रेडिंग १०इतर ५५.३जेडीयू मेघा इंजिनीअरिंग १०इतर १२(आकडे काेटी रुपयांमध्ये)
टॉप सहा कंपन्यांनी काेणाला किती दिली देणगी?
- फ्युचर गेमिंग १,३६५
तृणमूल ५४२डीएमके ५०३वायएसआरसीपी १५४बीजेपी १००इतर ६०
- मेघा इंजिनीअरिंग १,१८६
भाजप ४६४बीआरएस १९५काँग्रेस १२४डीएमके ८५इतर ११४
- संजीव गाेयनका समूह ६०६
तृणमूल ४५९भाजप १२७काँग्रेस १५ बीआरएस ५
- केव्हेंटर समूह ५७३
भाजप ३४५काँग्रेस १२२तृणमूल ६५इतर ३८.५
- आदित्य बिर्ला समूह ५४३
भाजप २७५बीजेडी २६४.५शिवसेना ३काँग्रेस ०.१
- क्विक सप्लाय ४१०
भाजप ३७५शिवसेना २५राष्ट्रवादी काँग्रेस १०