शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

‘डेल्टा प्लस’वर कोणती लस? जाणून घ्या एम्स प्रमुख काय म्हणतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2021 06:29 IST

डेल्टा प्लसच्या संसर्गावर तज्ज्ञ मंडळी लक्ष ठेवून आहेत. त्याच्या जनुकीय क्रमनिर्धारणाची (जिनोम सिक्वेन्सिंग) गरज असून डेल्टा प्लस किती प्रमाणात परिणामकारक ठरू शकतो, हे त्यातून समजू शकणार आहे. 

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच डेल्टा प्लस या नव्या उत्परिवर्तनाने डोके वर काढले आहे. त्यामुळे देशाच्या चिंतेत भर पडली आहे. सद्य:स्थितीत या नव्या उत्परिवर्तनाचे बाधित किरकोळ संख्येत असले तरी त्याचे तिसऱ्या लाटेत रुपांतर होण्याची भीती व्यक्त होत आहे. या नव्या उत्परिवर्तनावर लसीचे एकत्रित डोस (मिक्सिंग) प्रभावी ठरू शकतील, असे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) प्रमुखांचे म्हणणे आहे.

काय आहे ‘एम्स’प्रमुखांचे म्हणणे?nडेल्टा प्लस हे कोरोनाचे नवे उत्परिवर्तन अधिक आक्रमक असून त्याच्या संसर्गाचे प्रमाण अधिक आहे. nया उत्परिवर्तनाला रोखण्यासाठी लसींच्या एकत्रित मात्रा (मिक्सिंग डोस) देणे हा एक पर्याय ठरू शकतो. nपरंतु त्यासाठी कोणत्या लसींचे मिश्रण अधिक योग्य ठरेल यासंदर्भातील डेटाची गरज भासणार आहे, असे एम्सचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी स्पष्ट केले आहे. nगेल्या आठवड्यात केंद्र सरकारने उत्परिवर्तनाविरोधात लसींच्या एकत्रिकरणाला अधिक प्राधान्य देण्याचे सूतोवाच केले होते. nलसमात्रांच्या मिश्रणाचे प्रयोग इतरही देशांमध्ये सुरू आहेत. 

nडेल्टा उत्परिवर्तनाविरोधात लसीची एकच मात्र पुरेशी नाही, असेही डॉ. गुलेरिया यांचे म्हणणे आहे.nसंशोधनातही एकच मात्रा केवळ ३३ टक्क्यांपर्यंतच प्रभावी ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. nदोन्ही मात्रा दिल्यानंतर ९० टक्के लाभार्थी सुरक्षित होतात. nत्यामुळे डेल्टा उत्परिवर्तनावर लसीच्या दोन मात्राच परिणामकारक ठरतील. nडेल्टा प्लसच्या संसर्गावर तज्ज्ञ मंडळी लक्ष ठेवून आहेत. त्याच्या जनुकीय क्रमनिर्धारणाची (जिनोम सिक्वेन्सिंग) गरज असून डेल्टा प्लस किती प्रमाणात परिणामकारक ठरू शकतो, हे त्यातून समजू शकणार आहे. 

लसमात्रा मिश्रणावर आतापर्यंत दोन अहवाल 

nदोन लसींच्या मात्रांचे मिश्रण तयार करून त्यांचा डोस बनविण्याच्या प्रयोगावर आतापर्यंत दोन अहवाल प्रसिद्ध झाले आहेत. nत्यातील एक लॅन्सेटच्या गेल्या महिन्याच्या अंकात प्रसिद्ध झाला. दोन लसींच्या मिश्रणात एका समूहाला पहिला डोस कोविशील्डचा देण्यात आला तर दुसरा डोस फायझरच्या लसीचा देण्यात आला. त्यातील काहींवर सौम्य दुष्परिणाम जाणवले. परंतु दोन लसींच्या मिश्रणाचा पूर्ण डेटा मिळणे अद्याप बाकी आहे. 

nदुसरा प्रयोग स्पेनमध्ये करण्यात आला. त्यात कोविशील्ड आणि फायझर लस यांच्या मिश्रणाचा समावेश होता. या मिश्र लसी प्रभावी असल्याचे प्रयोगातून सिद्ध झाले. nत्यामुळे डेल्टा प्लसवर दोन लसींचे मिश्रण प्रभावी ठरण्याची चिन्हे आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसAIIMS hospitalएम्स रुग्णालय