शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
4
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
5
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
6
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
7
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
8
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
9
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
10
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
11
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
12
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
13
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
14
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
15
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
16
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
17
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
18
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
19
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
20
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!

‘यूपीए’ आता आहेच कुठे ? ममता बॅनर्जींचा सवाल; शरद पवार यांच्याशी पर्यायांविषयी चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2021 07:37 IST

Mamata Banerjee News: ‘यूपीए आता आहे कुठे?, यूपीए आता नाही’, असे म्हणत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपविरोधात काँग्रेसच्या नेतृत्वातील ‘यूपीए’ ऐवजी समविचारी पक्षांचा नवा पर्याय देण्याचे स्पष्ट संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चेनंतर बुधवारी दिले.

मुंबई : ‘यूपीए आता आहे कुठे?, यूपीए आता नाही’, असे म्हणत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपविरोधात काँग्रेसच्या नेतृत्वातील ‘यूपीए’ ऐवजी समविचारी पक्षांचा नवा पर्याय देण्याचे स्पष्ट संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चेनंतर बुधवारी दिले. या भेटीनंतर दोघांनीही पत्रकारांशी संवाद साधला.

शरद पवार यांच्याकडे आपण यूपीएचे नेतृत्व देणार का, असा प्रश्न विचारला असता ममता बॅनर्जी यांनी, पर्यायाच्या नेतृत्वाबाबत आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ, असे स्पष्ट केले. त्याच वेळी शरद पवार यांनी ‘भाजपला मजबूत पर्याय देताना काँग्रेसला वगळण्याची चर्चाच नाही. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका आहे. त्यासाठी जो मेहनत करेल आणि सर्वांसोबत यायला तयार आहे, त्या सर्वांना घेऊन आम्ही ुढे जाणार आहोत’, अशी भूमिका मांडली.

भाजपला पर्याय देऊ शकेल आणि ज्यावर लोकांचा विश्वास आहे अशा रस्त्याने आम्ही जाऊ. आमच्यात नेतृत्वाचा विषय नाही. नेतृत्व कोणाचे ही दुय्यम बाब आहे, असेही पवार म्हणाले. काँग्रेसच्या नेतृत्वात संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) कार्यरत असताना ममता यांनी,‘आता यूपीए अस्तित्वात नाही’ असे विधान करून पुढील काळात काँग्रेसच्या नेतृत्वातील यूपीए ऐवजी भाजप विरोधात अन्य पर्याय उभा करण्याचे सूचित केले.

सिल्व्हर ओक या पवार यांच्या निवासस्थानी दोघा नेत्यांची तासभर चर्चा झाली. प्रफुल्ल पटेल यांच्यासह राज्यातील राष्ट्रवादीचे प्रमुख नेते बैठकीला उपस्थित होते. शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी ममता बॅनर्जी यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्या शरद पवार यांना भेटल्या. मुंबईच्या दौऱ्यात त्यांनी एकाही काँग्रेस नेत्याशी चर्चा केली नाही. यावरूनही त्या काँग्रेसला वगळून भाजपविरोधात आघाडी करण्याच्या प्रयत्नात असल्याचे म्हटले जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आरोग्य लवकरच ठणठणीत होवो, अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करते, या शब्दांत बॅनर्जी यांनी मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या.

ममता म्हणाल्या...-‘यूपीए आता आहे कुठे?, यूपीए आता नाही.’- फॅसिझमच्या विरोधात मजबूत पर्याय द्यावा लागेल.- कोणताही नेता विदेशात राहणार असेल तर, भाजपशी कसे काय लढणार?, फिल्डमध्ये राहूनच लढावे लागेल. 

सामूहिक नेतृत्वाची रणनीती-यूपीए अस्तित्वात नसल्याच्या ममता बॅनर्जी यांच्या विधानाला शरद पवार यांनी छेद दिला नाही. काँग्रेसच्या नेतृत्वातच भाजपला पर्याय दिला जाईल, असेही पवार यांनी म्हटले नाही. - सामूहिक नेतृत्वाची संकल्पना मांडत त्यांनी  ममता यांच्या भूमिकेला पाठिंबा दिल्याचे समजते. सामूहिकरित्या भाजपच्या विरोधात उभे राहावे व काँग्रेसने त्यात सहभागी व्हावे, अशी ममता व पवार यांची रणनीती दिसत आहे. 

शरद पवार म्हणाले...-फिल्डमध्ये राहूनच जिंकता येते, हे त्यांचे म्हणणे बरोबर आहे.-पश्चिम बंगालमध्ये त्यांनी व त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांनी ते सिद्धदेखील केले आहे.-समविचारी पक्षांनी आज आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही भाजपच्या विरोधात एकत्र आले पाहिजे, हा त्यांचा प्रयत्न आहे. बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.

काँग्रेसविना भाजपचा पराभव हे दिवास्वप्नचकाँग्रेसला बरोबर घेतल्याशिवाय भाजपचा पराभव करण्याची भाषा कोणी करीत असेल, तर ते दिवास्वप्नच ठरेल, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी दिली. सध्या जवळपास सर्वच विरोधी पक्ष काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएचा भाग आहे. तरी ममता यांनी हे वक्तव्य केल्याची संतप्त प्रतिक्रिया काँग्रेसमध्ये उमटली. वेणुगोपाल म्हणाले की, भारतीय राजकारणाची ज्यांना माहिती आहे, त्यांना काँग्रेसविना भाजपशी लढता येणे शक्य नाही, हे समजते. काँग्रेसविना भाजपच्या पराभवाचा विचार हे दिवास्वप्नच ठरेल.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीSharad Pawarशरद पवारcongressकाँग्रेसPoliticsराजकारण