शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मंदी... कुठे आहे मंदी, नवरात्री - दसऱ्याला महागड्या उत्पादनांच्या विक्रीत 15 ते 25 टक्क्यांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2017 15:13 IST

नोटाबंदी नी जीएसटीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडल्याच्या बातम्या सगळीकडे येत असताना, नवरात्र व दसऱ्याच्या मुहूर्तावर उपभोगाच्या वस्तुंची खरेदी चांगलीच वाढल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नवरात्री व दसऱ्याला होणारी खरेदी 15 टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले आहे

ठळक मुद्देखेड्यांमधले ग्राहकही 60 ते 65000 रुपये किमतीचे टिव्हीसेट घेत असल्याचा दाखलानवरात्रीमध्ये मारुतिच्या गाड्यांची नोंदणी 18 टक्क्यांनी वाढली तर विक्री 15 टक्क्यांनी वाढलीहुंदाईसाठी ही नवरात्र विक्रमी ठरली असून कंपनीच्या गाड्यांची विक्री तब्बल 50 टक्क्यांनी वाढली

मुंबई - नोटाबंदी नी जीएसटीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडल्याच्या बातम्या सगळीकडे येत असताना, नवरात्र व दसऱ्याच्या मुहूर्तावर उपभोगाच्या वस्तुंची खरेदी चांगलीच वाढल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नवरात्री व दसऱ्याला होणारी खरेदी 15 टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले आहे.

विशेष म्हणजे, केवळ शहरांमध्येच नाही तर लाहन सहान शहरांमध्ये व खेड्यांमध्येही महागडी उपकरणे विकत घेण्याचा कल वाढला असल्याचे दिसत आहे. देशभरामध्ये महाग उत्पादने घेण्याकडे ग्राहकांचा कल असल्याचे मारुति, हुंदाई, एलजी, सोनी, पॅनासॉनिक व गोदरेज अप्लायंसेस या कंपन्यांनी म्हटले आहे. चांगला पाऊस व स्वस्तात उपलब्ध असलेली कर्जे यामुळे भारताच्या कानाकोपऱ्यात ग्राहकांच्या खरेदीला वेग आल्याचे इकॉनॉमिक टाइम्सने म्हटले आहे. सोनी इंडियाचे सेल्स हेड सतीश पद्मनाभन यांच्या सांगण्यानुसार नवरात्रीमध्ये ग्राहकांची क्रयशक्ती वाढल्याचे जाणवत आहे.आता आतापर्यंत मोठ्या आकाराचे टिव्ही केवळ शहरांमध्ये खपत असत.

मात्र, आता खेड्यांमधले ग्राहकही 60 ते 65000 रुपये किमतीचे टिव्हीसेट घेत असल्याचा दाखला पद्मनाभन यांनी दिला आहे. एलजी इलेक्ट्रॉनिक्सचे इंडिया सीएमओ अमित गुजराल यांच्या सांगण्यानुसार जीएसटी व नोटाबंदी यांमुळे झालेला विपरीत परिणाम आता मागे पडला आहे आणि या नवरात्री व दसऱ्याला विक्रीमध्ये 30 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ विक्रीमध्ये झाली आहे.

नवरात्रीमध्ये मारुतिच्या गाड्यांची नोंदणी 18 टक्क्यांनी वाढली तर विक्री 15 टक्क्यांनी वाढली आहे. तर हुंदाईसाठी ही नवरात्र विक्रमी ठरली असून कंपनीच्या गाड्यांची विक्री तब्बल 50 टक्क्यांनी वाढली आहे. ओणम व गणेशोत्सवामध्ये तयार झालेल्या उत्साही वातावरणाने नवरात्रीमध्ये कळस गाठल्याची भावना हुंदाई मोटर्स इंडियाचे सेल्स व मार्केटिंगचे संचालक राकेश श्रीवास्तव यांनी व्यक्त केली आहे. या नवरात्रीमध्ये 26000 गाड्या जास्त विकल्या गेल्या असून दिवाळीमध्येही विक्रमी विक्री होईल असा अंदाज आहे.महागडे रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशिन्स व इन्हर्टर एसीची विक्रीही या उत्सवी मोसमात 25 टक्क्यांनी वाढली आहे.

टॅग्स :saleविक्रीMarutiमारुतीHyundaiह्युंदाई