शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

कुठे गेल्या ५०० रुपयाच्या नोटा?; छापलेल्या ८८००० कोटींचा हिशोबच नाही, काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2023 18:21 IST

या प्रकाराचा बारकाईने तपास करून वस्तूस्थिती समोर आणावी असं म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला. 

मुंबई - ५०० रुपयांच्या नोटा अचानक बाजारातून गायब झाल्यात. जवळपास ८८ हजार कोटींच्या ५०० रुपयांच्या नोटा कुठे गेल्यात हा प्रश्न उभा राहिला आहे. गायब झालेल्या या पैशाचा हिशोब लागत नाही. RBI ने ५०० रुपयांच्या ८८१०.६५ मिलियन नोटा छापल्या होत्या. परंतु बँकांकडे सध्या ७२६० मिलियन नोटाच आहेत. म्हणजे जवळपास १७६ कोटी ५०० रुपयांच्या नोटा चलनातून गायब झाल्या आहेत. या गायब झालेल्या नोटांची किंमत तब्बल ८८ हजार कोटी आहे. हा खुलासा RTI च्या एका रिपोर्टमधून झाला आहे. 

नोटा छपाई देशात फक्त ४ ठिकाणी होते. देवास, नाशिक, म्हैसूर आणि सालबोनी इथं आरबीआय नोटा छपाईचे काम करते. अशात एप्रिल २०१५ ते मार्च २०१६ या काळात नाशिकच्या प्रेसमधून २१० मिलियन ५०० रुपयांच्या नोटा गायब झाल्या आहेत. Free Press Journal रिपोर्टनुसार, आरटीआयमधून ही बाब उघडकीस आली आहे. आरटीआय कार्यकर्ते मनोरंजन रॉय यांनी या नोटांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. 

रिपोर्टनुसार, आरटीआयच्या माध्यमातून मनोरंजन रॉय यांनी गायब झालेल्या नोटांबाबत माहिती मागवली होती. त्यानुसार, २०१५ ते मार्च २०१६ या काळात नाशिकमध्ये ३७५.४५० मिलियन ५०० रुपयांच्या नोटांची छपाई केली होती. परंतु RBI च्या रेकॉर्डमध्ये केवळ ३४५ मिलियन नोटा आहेत. २०१५-२०१६ या काळात रघुराम राजन हे RBI चे गर्व्हनर होते. RTI मध्ये एप्रिल २०१५ ते मार्च २०१६ या काळात २१० मिलियन नोटा छापल्या गेल्याचे सांगितले ज्या RBI ला पाठवण्यात आल्यात. तर नाशिकमधील प्रेसने सांगितले की, आम्ही नवीन ५०० च्या नोटा सेंट्रल बँकेला पाठवल्या होत्या. परंतु याचा उल्लेख RBI च्या वार्षिक रिपोर्टमध्ये कुठेही नाही. 

अजित पवारांचा सरकारवर निशाणानोटांची छपाई झाली पण नोटा आरबीआयकडे पोहचल्या नाहीत. अशा हजारो कोटी नोटा गायब झाल्याची बातमी समोर आलीय. त्याबाबत अर्थ विभाग, आरबीआयनं लोकांच्या मनातील शंका दूर करायला हवी. बनावट नोटा बाजारात आल्या, नोटाबंदी करून काळा पैसा बाहेर काढायचा असं सरकारने सांगितले होते. देशाच्या भल्यासाठी काय करायचे ते करू द्या, पण हे केल्यानंतर २ हजारांची नोट काढली, पुन्हा ती बंद केली. हा पोरखेळ सुरू आहे का? या बातमीत किती तथ्य आहे हे सरकारने सांगावे. काहीच सांगायला सरकार तयार नाही. जनतेचा अधिकार आहे. या प्रकाराचा बारकाईने तपास करून वस्तूस्थिती समोर आणावी असं म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला. 

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकAjit Pawarअजित पवार