कुठे गेली 56 इंचाची छाती? सोशल मीडियावर मोदींना चिमटे

By Admin | Updated: September 19, 2016 18:40 IST2016-09-19T18:15:23+5:302016-09-19T18:40:33+5:30

सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची खिल्ली उडवण्यात येत आहे.कुठे गेली मोदींची 56 इंचाची छाती?असा प्रश्न विचारून

Where did the 56-inch chest? Modi pimples on social media | कुठे गेली 56 इंचाची छाती? सोशल मीडियावर मोदींना चिमटे

कुठे गेली 56 इंचाची छाती? सोशल मीडियावर मोदींना चिमटे

ऑनलाइन लोकमत

मुंबई,दि.19- देश पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याने हादरला आहे. पाकिस्तानातून आलेल्या  4 दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरच्या उरीमध्ये लष्कराच्या मुख्यालयावर हल्ला केला आणि देशाचे 18 जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर शहीदांच्या परीवारासह संपूर्ण देशातून पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्याची मागणी जोर धरत आहे. तर दुसरीकडे सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची खिल्ली उडवण्यात येत आहे.  कुठे गेली मोदींची 56 इंचाची छाती?  असा प्रश्न विचारून ट्वीटर, फेसबुकवर मोदींना चिमटे काढले जात आहेत.

एक नजर सोशल मीडियावरील प्रतिक्रियांवर-
गीतू जिंदाल या अकाउंटवरून आलेली प्रतिक्रिया , असेच हल्ले होत राहणार आणि आमचे जवान शहीद होत राहणार कुठे गेली 56 इंच छाती?
 
अच्छे दिन नावाच्या अकाउंटवरून आलेली प्रतिक्रिया, एएनआयच्या कॅमेरामनच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक? काहीतरी करत आहोत हे दाखवण्यासाठी हे केलं जातंय का...नाटकी सरकार
 
 
विनोद कुमार पटेल यांनी गृहमंत्र्यांवर राग व्यक्त केला आहे. गृहमंत्र्यांनी बांगड्या घालून राजिनामा द्यायला हवा.
चीडचीडे भाईसाहब या अकाउंटवरून आलेली प्रतिक्रिया ,  हेमराजचं मुंडक कापण्याच्या घटनेनंतर तुमचं भाषण झालं होतं, पठाणकोट आणि उरी हल्ल्यानंतर मी ते भाषण वारंवार पाहिल आणि तितक्याच वेळेस मी रडलो.
रोफेल रिपोर्टर या अकाउंटवरून आलेली प्रतिक्रिया ,  कालपासून आजपर्यंत 56 इंच छातीवाल्याला राग नाही आला का? पहिले तर त्यांचे तुकडे-तुकडे करण्याची भाषा होत होती.
प्रिती शर्मा मेनन  या अकाउंटवरून आलेली प्रतिक्रिया ,  पहिले पाकिस्तानातून शीर आणायची भाषा करत होते, आमचे जवान शहीद होत राहतात आणि हे धर्मनिरपेक्षकांच्या नावे बोटं मोडत राहतात.
 
रितीका सिंग या अकाउंटवरून आलेली प्रतिक्रिया,सर पहिले पठाणकोट आणि आता उरी हल्ला, देशाला विश्वास नाही बदला पाहिजे.
 

 

Web Title: Where did the 56-inch chest? Modi pimples on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.