शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

गहलोत मुख्यमंत्रिपद कधी साेडणार? राजीनाम्याबाबत काॅंग्रेसमध्ये वेगवेगळे मतप्रवाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2022 14:08 IST

उमेदवारी अर्ज भरण्याआधी की नंतर? राजीनाम्याबाबत काॅंग्रेसमध्ये वेगवेगळे मतप्रवाह

आदेश रावललोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : राजस्थानचे मुख्यमंत्री  अशोक गहलोत यांनी राजीनामा देण्याचे वक्तव्य केलेले आहे. मात्र, ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी राजीनामा देणार की अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर राजीनामा देणार, याबाबत आता काँग्रेसमध्ये चर्चा सुरू झाली आहे.काही जाणकारांचे म्हणणे आहे की, त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी राजीनामा दिला पाहिजे, तर गहलोत यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे की, अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतरच ते राजीनामा देतील. कारण एक व्यक्ती एक पदाचा नियम त्यांना अध्यक्ष झाल्यानंतरच लागू होईल. सध्या तर ते मुख्यमंत्री आहेत.

सचिन पायलट यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे की, गहलोत यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी राजीनामा दिला नाही, तर अध्यक्ष झाल्यानंतर ते आणखी जास्त मजबूत होतील. त्यानंतर ते सचिन पायलट यांना अधिक अडचणीत आणू शकतील. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व गहलोत यांच्यात नेमकी कोणती चर्चा झाली, याबाबत आता सर्वांच्या नजरा काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे लागल्या आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी गहलोत यांना राजीनामा द्यायचा असेल, तर त्यांना रविवारपर्यंत द्यावा लागेल. २६ सप्टेंबर रोजी गहलोत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. 

राजस्थानातील उत्तराधिकारी कोण?काँग्रेस अध्यक्षपदाच्या संदर्भात राहुल गांधी यांनी ‘एक व्यक्ती एक पद’ असे विधान केले होते. त्याबाबत तसेच तुम्ही निवडणूक जिंकली तर तुमचे राजस्थानातील उत्तराधिकारी कोण असतील, याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गहलोत म्हणाले की, सोनिया गांधी आणि राजस्थानचे प्रभारी अजय माकन याबाबत निर्णय घेतील.

‘पक्षाध्यक्षपदाची निवडणूक लढवणार’nकोची : आपण पक्षाध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहोत, असे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. निवडणूक निकालाची पर्वा न करता संघटितपणे काम करून पक्षाला  मजबूत विरोधी पक्ष म्हणून उदयाला आणणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. nगेहलोत यांनी सांगितले की,पक्षातील काही मित्रदेखील निवडणूक लढवू शकतात. तथापि, एकजूट महत्त्वाची असून संघटनेला सर्व स्तरांवर बळकट करण्याची गरज आहे. पक्षातील मित्रांनी ही निवडणूक लढवली तरी अडचण नाही. आम्ही सर्वांनी पक्षाला सामर्थ्यशाली बनविण्यासाठी एकत्र काम केले पाहिजे. आपण पक्ष विचारसरणीला आधार बनवून पुढे जायला हवे. जेणेकरून आम्ही एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून उदयास येऊ. 

शिर्डी : साईबाबांचे आशीर्वाद घेतले. आता पुढचा मार्ग मोकळा झाला. आपण अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करणार आहोत. राहुल गांधी यांनी गांधी कुटुंबातील कोणीही निवडणूक लढवणार नसल्याचे अगोदरच स्पष्ट केले आहे़  पक्षांतर्गत निवडणुकीनंतर पक्षमजबुतीसाठी सगळे एकदिलाने काम करू, असा विश्वास अशोक गेहलोत यांनी शिर्डीत व्यक्त केला़. गेहलोत यांनी दुपारी मध्यान्ह आरतीनंतर साईदरबारी हजेरी लावली़ आपण मुख्यमंत्रिपद सोडायला तयार नसल्याच्या चुकीच्या बातम्या माध्यमांनी दिल्या़  राजस्थान ही माझी जन्मभूमी व कर्मभूमी असल्याने मी कायम राजस्थानच्या सेवेत राहील या आपल्या वाक्याचा गैर अर्थ काढण्यात आला़. पक्षाने अनेक पदे, मानसन्मान दिला़  त्यामुळे हायकमांड सांगतील ते करणार व करावेच लागेल, असे गेहलाेत म्हणाले. 

टॅग्स :congressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधी