शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे उशिरा पोहोचल्याने NEET परीक्षेला 500 विद्यार्थी मुकले, सरकारने घेतला 'हा' निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 23:19 IST

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सिद्धरामैय्या यांनी विद्यार्थ्यांच्या या नुकसानीला रेल्वे प्रशासन जबाबदार असल्याचे सांगत हा मुद्दा उचलून धरला होता.

नवी दिल्ली - कर्नाटकमध्ये रेल्वेला पोहोचण्यास उशिर झाल्यामुळे मेडिकलची इच्छा बाळगणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांचे भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. रविवारी देशभरातील विद्यार्थ्यांसाठी मेडिकल प्रवेशासाठीची पात्रता  परीक्षा म्हणजे NEET घेण्यात आली होती. मात्र, कर्नाटकमधील शेकडो जवळपास 500 विद्यार्थी या परीक्षेला मुकले होते. कारण, बंगळुरू येथे परीक्षा सुरू झाल्यानंतर तब्बल एक तास उशिराने त्यांची रेल्वे बंगळुरूला पोहोचली. त्यामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांना NEET ची परीक्षा देता आली नाही. उत्तर कर्नाटकातून सुटणाऱ्या हम्पी एक्सप्रेसबाबत ही घटना घडली.

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सिद्धरामैय्या यांनी विद्यार्थ्यांच्या या नुकसानीला रेल्वे प्रशासन जबाबदार असल्याचे सांगत हा मुद्दा उचलून धरला होता. तसेच, याप्रकरणी ट्विट करुन त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणि मानव विकास मंत्रालयाला मेंशन केले होते. त्यानंतर, नीट परीक्षेचे प्रथमच आयोजन करणाऱ्या एजन्सीने या विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा घेण्याचे म्हटले होते. तसेच ओडिशातही फनी वादळामुळे विद्यार्थ्यांची परीक्षा 20 मे रोजी घेण्यात येईल, असे एजन्सीने स्पष्ट केले होते. दरम्यान, आता केंद्रीय मानव संसाधनमंत्री प्रकाश जावडेकर यांनीही ट्विट करुन रेल्वेला उशिरा झाल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा चुकली, त्या विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा घेण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आपल्या भविष्याची चिंता करणाऱ्या या विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात पडला.   

टॅग्स :NEET Result 2018नीट परीक्षा निकाल २०१८examपरीक्षाPrakash Javadekarप्रकाश जावडेकरBengaluruबेंगळूर