मोदींना भीती वाटते तेव्हा ते विष पसरवतात- राहुल गांधी
By Admin | Updated: February 24, 2017 22:30 IST2017-02-24T22:30:18+5:302017-02-24T22:30:18+5:30
मोदींवर थेट निशाणा साधताना राहुल म्हणाले,समाजवादी पक्ष आणि कॉग्रेस एकत्र आल्यामुळे मोदींचा चेहरा उतरलाय.

मोदींना भीती वाटते तेव्हा ते विष पसरवतात- राहुल गांधी
>ऑनलाइन लोकमत
बहराइच, दि.24 - कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. मोदींवर थेट निशाणा साधताना राहुल म्हणाले, समाजवादी पक्ष आणि कॉग्रेस एकत्र आल्यामुळे मोदींचा चेहरा उतरलाय. मोदींना जेव्हा भीती वाटते त्यावेळी ते विष पसरवायला सुरूवात करतात. मात्र, समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा आता त्यांना फायदा होणार नाही.
बलरामपूरमध्ये एका सभेला संबोधित करताना राहुल म्हणाले, मोदींना जेव्हा भीती वाटते त्यावेळी ते दोन समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करतात,विष पसरवायला सुरूवात करतात. मात्र, समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा आता त्यांना फायदा होणार नाही. समाजवादी पक्ष आणि कॉग्रेस एकत्र आल्यामुळे मोदींचा चेहरा उतरलाय, आम्ही 300 पेक्षा जास्त ठिकाणी जिंकण्याची त्यांना चिंता सतावत आहे.
उत्तर प्रदेशमध्ये अजून तीन टप्प्यातील मतदान बाकी आहे. त्यामुळे सर्वच पक्षांकडून एकमेकांवर चिखलफेक सुरू आहे.