शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
5
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
6
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
7
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
8
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
9
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
10
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
11
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
12
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
13
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
14
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
15
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
16
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
19
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
20
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

आयटीआयची परीक्षा कधी? देशातील २३ लाख प्रशिक्षणार्थी संभ्रमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 12:09 IST

आयटीआय परीक्षा कधी आणि कशा पद्धतीने होणार याबाबत साशंकता; कुशल मनुष्यबळ निर्मितीला खीळ बसण्याची शक्यता

ठळक मुद्देपरीक्षा केंद्रासाठी प्रशिक्षणार्थींना देण्यात येणारे प्रवेशपत्र व ओळखपत्र उपलब्ध होण्यास विलंब ऑनलाइन अभ्यास; मात्र सराव बंद औद्योगिक क्षेत्राला कुशल मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणात गरज

नारायण बडगुजरपिंपरी : देशभरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या (आयटीआय) परीक्षा दरवर्षी जुलै किंवा ऑगस्टच्या सुरुवातीला होतात. कोरोनामुळे त्या पुढे जाण्याची शक्यता आहे. मात्र, परीक्षा कधी आणि कशा पद्धतीने होणार, याबाबत साशंकता आहे. त्यामुळे २३ लाख प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षक व पालक संभ्रमात आहेत. परीक्षेसंबंधी अद्याप कोणतीही माहिती प्रशिक्षण संस्थांना आलेली नाही. त्यामुळे जुलैमध्ये परीक्षा अशक्य असल्याचे सांगण्यात येते. परीक्षा कधी होणार हे निश्चित नाही, तसेच नवे प्रवेश कधी सुरु होणार हे देखील स्पष्ट नसल्याने कुशल मनुष्यबळ निर्मितीला खीळ बसण्याची शक्यता आहे. राज्यातील पुणे, मुंबई, पिंपरी-चिंचवड, नाशिक, औरंगाबाद यांसह इतरही जिल्ह्यांत एमआयडीसी आहेत. या औद्योगिक क्षेत्राला कुशल मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणात गरज असते. औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधून असे कुशल मनुष्यबळ निर्माण होते. ज्याचे संचलन केंद्रीय स्तरावरून होते. प्रशिक्षण महानिदेशालयाकडून त्यांच्यावर नियंत्रण ठेवले जाते. एकाच वेळेस आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया होते. परीक्षादेखील एकाच वेळी होते. वेळापत्रक एकसारखेच असते. महाराष्ट्रासह काही राज्यांत कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे अशा राज्यांत आयटीआयच्या परीक्षा कशा घ्याव्यात, याबाबत केंद्राच्या प्रशिक्षण महानिदेशालयाच्या संचालक पातळीवरून विविध पर्यायांचा  विचार सुरू आहे. आयटीआयच्या परीक्षेसाठी संबंधित प्रशिक्षणार्थींची माहिती, फोटोसह परीक्षेचा अर्ज ऑनलाइन भरला जातो. त्याची प्रक्रिया मे-जूनमध्ये होते. यंदा कोरोनामुळे ही प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे परीक्षा केंद्रासाठी प्रशिक्षणार्थींना देण्यात येणारे प्रवेशपत्र व ओळखपत्र उपलब्ध होण्यास विलंब होणार आहे. 

......................................

ऑनलाइन अभ्यास; मात्र सराव बंद इतर शैक्षणिक संस्थांप्रमाणेच आयटीआय बंद आहेत. कार्यालयीन कामकाज सुरू आहे. त्यामुळे प्रशिक्षणार्थींना आयटीआयमध्ये जाता येत नाही. परिणामी सराव (प्रॅक्टिकल) थांबला आहे. मात्र, त्यांना ऑनलाइन अभ्यास देण्यात येत आहे. संबंधित विषयाचे शिक्षक व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून नियमित अभ्यास देतात. तसेच त्याबाबत महिनाभराचा अहवाल संबंधित शिक्षक गटनिर्देशक किंवा प्राचार्यांकडे सादर करतात.   

प्रशिक्षणार्थींना ऑनलाइन अभ्यास दिला जात आहे. परीक्षांबाबत अद्याप सूचना किंवा निर्देश आलेले नाहीत. वरिष्ठ पातळीवरून निर्देश आल्यानंतर त्यानुसार कार्यवाही केली जाईल. - शशिकांत पाटील, प्राचार्य, आयटीआय, मोरवाडी, पिंपरी 

.....................................

देशभरातील आकडेवारीएकूण आयटीआय - १४९१७  प्रशिक्षणार्थी - २३१४०००शासकीय आयटीआय - ३०६२एकूण प्रशिक्षणार्थी - ४६२१३९

.............................................

महाराष्ट्रातील आकडेवारीएकूण आयटीआय - ९८५एकूण विद्यार्थी - ९४१४२शासकीय आयटीआय -४२०एकूण प्रशिक्षणाथी - ६७१२६

टॅग्स :PuneपुणेMIDCएमआयडीसीiti collegeआयटीआय कॉलेजexamपरीक्षाStudentविद्यार्थी