खोलीकरण करताना जलवाहिनी फुटली

By Admin | Updated: February 7, 2016 22:46 IST2016-02-07T22:46:20+5:302016-02-07T22:46:20+5:30

जळगाव : मेहरुण परिसरातील सर्व्हे नंबर २५८मध्ये नाल्याचे खोलीकरण करताना पाणीपुरवठा करणारी ५०० मिमीची जलवाहिनी रविवारी फुटली. या नाल्यावरील अतिक्रमणासंदर्भात आपण या पूर्वीच मनपा आयुक्तांकडे तक्रार केल्याची माहिती या परिसरातील रहिवासी प्रशांत नाईक यांनी दिली.

When digging the water screws | खोलीकरण करताना जलवाहिनी फुटली

खोलीकरण करताना जलवाहिनी फुटली

गाव : मेहरुण परिसरातील सर्व्हे नंबर २५८मध्ये नाल्याचे खोलीकरण करताना पाणीपुरवठा करणारी ५०० मिमीची जलवाहिनी रविवारी फुटली. या नाल्यावरील अतिक्रमणासंदर्भात आपण या पूर्वीच मनपा आयुक्तांकडे तक्रार केल्याची माहिती या परिसरातील रहिवासी प्रशांत नाईक यांनी दिली.
या संदर्भात नाईक यांनी सांगितले की, मनपा व जिल्हा प्रशासन नाल्यावरील अतिक्रमणासंदर्भात सामान्यांना वेठीस धरत आहे, तर दुसरीकडे इतरांना प्लॉटिंगची परवानगी देत आहे. अशाच प्रकारे मनपाने सर्व्हे नंबर २५८मध्ये नाल्यावर प्लॉटिंगची परवानगी दिली. त्याच्या बाजूनेच मेहरुण तलावातील ३० मीटरचा ओव्हरफ्लो आहे. या संदर्भात आपण या पूर्वीच मनपा आयुक्तांकडे तक्रार देऊन परवानगी न देण्याची मागणी केली होती, मात्र त्याची दखल घेतली गेली. त्यामुळे आज तेथे खोलीकरण करताना जलवाहिनी फुटल्याचे प्रशांत नाईक यांचे म्हणणे आहे.

Web Title: When digging the water screws

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.