जलशिवार, घरकुलातील कामांबाबत सीईओंची नाराजी लक्ष्मांक कधी पूर्ण करणार : ४० टक्केही काम झालेले नाही
By Admin | Updated: March 11, 2016 00:28 IST2016-03-11T00:28:01+5:302016-03-11T00:28:01+5:30
जळगाव- जलशिवार, मनरेगा, घरकुलांसंबंधी दिलेल्या लक्ष्यांकाच्या तुलनेत ४० टक्केही काम झालेले नाही. यासंदर्भात गुरुवारी सीईओ आस्तिककुमार पांडेय यांनी समन्वय सभेमध्ये नाराजी व्यक्त केली.

जलशिवार, घरकुलातील कामांबाबत सीईओंची नाराजी लक्ष्मांक कधी पूर्ण करणार : ४० टक्केही काम झालेले नाही
ज गाव- जलशिवार, मनरेगा, घरकुलांसंबंधी दिलेल्या लक्ष्यांकाच्या तुलनेत ४० टक्केही काम झालेले नाही. यासंदर्भात गुरुवारी सीईओ आस्तिककुमार पांडेय यांनी समन्वय सभेमध्ये नाराजी व्यक्त केली. घरकुलांचा चार हजारांचा लक्ष्यांक अपूर्ण आहे. मनरेगासंबंधी ४० टक्केही काम झालेले नाही. विहीर पुनर्भरणासंबंधी प्रत्येक तालुक्यात २० चा लक्ष्यांक दिला होता. परंतु ५० टक्केही काम याबाबत झालेले नाही. कमाल बीडीओ कामांसंबंधी प्रगती करण्यात अपयशी ठरल्याने सीईओंनी नाराजी व्यक्त केेली. इन्फो-चाळीसगाव, जामनेर बीडीओंवर कारवाईचे संकेतकामात प्रगती नसल्याने जामनेर व चाळीसगाव येथील बीडीओंवर कारवाई करण्याचे संकेत सीईओंनी दिले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमधील अधिकार्यांनाही सीईओंनी धारेवर धरले. इन्फोरिक्त पदांचा प्रश्नजिल्हाभरात पाच बीडीओंची पदे रिक्त आहे. रावेर व यावल येथील काम एकच बीडीओंच्या आधारावर सुरू आहे. बोदवड, मुक्ताईनगर, एरंडोल येथे बीडीओ नाहीत. तर काही दिवसांमध्ये पाच बीडीओ निवृत्त होतील. बाल विकास प्रकल्प अधिकार्यांची नऊ पदे रिक्त आहेत. ही स्थिती असल्याने विविध कामांच्या संदर्भात प्रगती करणे, लक्ष्यांक साध्य करणे कठीण जात आहे. या पार्श्वभूमीवर शासनाकडे बीडीओंची नियुक्ती करण्यासंबंधी पत्र देणार असल्याचेही सीईओ पांडेय म्हणाले.