शहरं
Join us  
Trending Stories
1
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले
4
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
5
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
6
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
7
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
8
पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!
9
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
10
वसईची भयंकर घटना, मुंबईला धोक्याची घंटा!
11
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
12
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
13
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
14
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
15
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
16
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
17
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
18
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
19
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
20
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ

वनप्लसचा सर्वात स्वस्त फोन भारतात कधी येणार? लाँचिंगची तारीख Amazon नेच केली लीक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2020 16:22 IST

नवी दिल्ली : वनप्लस स्मार्टफोनच्या किंमती सामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने कंपनीने नवीन परवडणाऱ्या किंमतीतील रेंज लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

नवी दिल्ली : वनप्लस स्मार्टफोनच्या किंमती सामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने कंपनीने नवीन परवडणाऱ्या किंमतीतील रेंज लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार OnePlus Nord स्मार्टफोन भारतात लाँच केला जाणार आहे. याची किंमत 25000 पेक्षा कमी ठेवण्यात येण्याची शक्यता आहे. अॅमेझॉन इंडियाच्या टीझर पेजवर हा फोन कधी लाँच होईल याची माहिती चुकून दिली गेली होती. ती डिलीट करण्यात आली आहे. 

टीझर पेजवर OnePlus Nord च्या AR लॉन्च इव्हेंटची माहिती देण्यात आली. मात्र याचवेळी चुकून लाँचिंगची तारीखही टाकण्यात आली होती. या फोटोमध्ये AR लॉन्च इन्व्हाईटही टाकण्यात आले होते. तसेच या फोटोवर क्लिक केल्यावर ओपन होणाऱ्या पेजवर एक लिंकही देण्यात आली होती. सध्या ती लिंक लाईव्ह नाहीय. सर्वात आधी टेक रडारने याची माहिती दिली. 

या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 765G प्रोसेसर असणार आहे. हा फोन भारत आणि युरोपमध्ये लाँच केला जाणार आहे. या लीकनुसार हा फोन भारतात येत्या 21 जुलैला लाँच केला जाणार आहे. वनप्लसने अमेरिकेतही धुमाकूळ घातला आहे. मात्र, हा फोन अमेरिकेत लाँच केला जाणार नाही. भविष्यात मिळण्याची शक्यता आहे. 

कंपनीच्या मालकाचे ट्विटकार्ल पे यांनी केलेल्या ट्वीटमध्ये 2014 मध्ये केलेले कंपनीचे एक जुने ट्विट एम्बेड आहे. हे ट्विट तेव्हाचे आहे जेव्हा कंपनीने पहिला वनप्लस One लाँच केला होता. या ट्विटमध्ये फोनचे नाव तर नाही घेतले गेलेय परंतू नव्या फोनची किंमत पहिल्या वनप्लसएवढी असण्याची शक्यता आहे. कंपनीने 299 डॉलरला हा स्मार्टफोन लाँच केला होता. ही किंमत फोनच्या 16 जीबी मॉडेलची होती.  या ट्विटनंतर उडालेल्या अफवांनुसार अॅपलचा आयफोन SE आणि गुगलच्या Pixel 4a ला टक्कर देण्यासाठी हा स्वस्त अँड्रॉईड फोन आणला जाणार आहे. जर या फोनची किंमत 299 डॉलर असेल तर तो आयफोन एसईपेक्षा 100 डॉलर  आणि पिक्सल 4ए पेक्षा 50 डॉलरने स्वस्त असणार आहे. सध्या वनप्लसचा कोणताही फोन  iPhone SE ला टक्कर देत नाही. वनप्लसने नुकतेच वनप्लस 8 आणि वनप्लस 8 प्रो फोन लाँच केले आहेत. ते iPhone 11 आणि गॅलेक्सी S20 चे प्रतिस्पर्धी आहेत. 

स्वस्तातील टीव्ही लाँचवनप्लसने गेल्या आठवड्यात तीन स्मार्ट टीव्ही लाँच केले आहेत. OnePlus TV U1 55, OnePlus TV 4-Series 43 आणि OnePlus TV Y-Series 32 इंचाचे हे टीव्ही आहेत. प्रत्येक टीव्हीची सिरिज वेगळी असली तरीही 32 इंचाच्या टीव्हीची किंमत आश्चर्यचकित करणारी आहे. OnePlus TV Y-Series 32 याची किंमत 12,999 रुपये आहे. तर 43 इंचाच्या टीव्हीची किंमत 22,999 रुपये आहे. 55 इंचाच्या टीव्हीची किंमत 49,999 रुपये ठेवण्यात आली आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

मुंबई मेट्रोमध्ये नोकरीची मोठी सुवर्णसंधी; पगार 1.22 लाखापर्यंत

सरकारी बँकेत नोकरीची मोठी संधी सोडू नका; 1850 जागांवर भरती

लॉकडाऊनमध्ये सरकारी नोकऱ्यांचा पाऊस! ग्रामीण बँकांमध्ये बंपर भरती; IBPS द्वारे करा अर्ज

गावाकडे चला! SBI मध्ये नोकरीची मोठी संधी; 25000 रुपयांपर्यत पगार

FD पेक्षाही जास्त व्याज देणार; केंद्र सरकारची 'अफलातून' योजना लाँच

विद्यापीठांच्या परिक्षांची घोषणा झाली, या महिन्यात होणार; यूजीसीकडून गाइडलाइन्स जारी

एक दोन नाही! 11 अमेरिकी लढाऊ विमानांनी चोहोबाजुंनी घेरले; चिनी सैन्य पाहतच राहिले

टॅग्स :Oneplus mobileवनप्लस मोबाईलamazonअ‍ॅमेझॉन