शहरं
Join us  
Trending Stories
1
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
2
Beed: अजित पवारांच्या ताफ्यासमोरच दोन तरुणांनी पेटवून घेण्याचा केला प्रयत्न, पोलिसांची धावपळ
3
६० मुस्लीम देशांच्या बैठकीत पाकिस्ताननं दिला 'इस्लामिक नाटो'चा प्रस्ताव; भारतासाठी किती चिंताजनक?
4
कॅनडातील वाणिज्य दूतावास ताब्यात घेणार; खलिस्तान समर्थकांची भारताला खुली धमकी...
5
२० वर्षांनंतर घेता येणार स्वेच्छा निवृत्ती, पण पूर्ण पेन्शनसाठी एवढ्या वर्षांची असणार अट
6
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
7
PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींचा डुप्लिकेट कोण? राजकीय सभांपासून बॉलिवूड सिनेमांमध्ये केलंय काम
8
Urban Company IPO Listing: ५६ टक्क्यांचं लिस्टिंग गेन, ₹१०३ च्या शेअरची धमाकेदार एन्ट्री; गुंतवणूकदार मालामाल
9
Nupur Bora : पैसाच पैसा! ५ वर्षांच्या सेवेत ९२ लाख, १ कोटीचे दागिने...; कोट्यवधींच्या कमाईने मुख्यमंत्रीही हैराण
10
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
11
PM Modi Birthday: जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
12
Astro Tips: शुभ मुहूर्त पाहून मूल जन्माला घालणे शक्य आहे का? त्रेतायुगात सापडते उत्तर!
13
सगळे सलमानची बाजू घेत होते, ब्रेकअपनंतर ऐश्वर्याची इंडस्ट्रीनं सोडली साथ, दिग्दर्शकाचा खुलासा
14
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
15
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
16
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
17
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
18
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
19
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
20
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?

भाजपा नेते मोदींकडे जातात, तेव्हा त्यांच्या बायका घाबरतात; मायावतींची जळजळीत टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 12:16 IST

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यापूर्वी नेत्यांमधील शाब्दिक चकमकी वैयक्तिक पातळीवर पोहोचल्या आहेत.

लखनौ - लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यापूर्वी नेत्यांमधील शाब्दिक चकमकी वैयक्तिक पातळीवर पोहोचल्या आहेत. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अलवर बलात्कार प्रकरणावरून मायावतींना लक्ष्य केल्यानंतर आता मायावतींनीही मोदींवर जोरदार टीका केली आहे. भाजपामध्ये खासकरून विवाहीत महिला त्यांचे पती मोदींकडे गेल्यावर हा विचार करून घाबरतात. कदाचित मोदी आपल्या पत्नीप्रमाणेच आम्हालाही आपल्या पतीपासून वेगळे करणार नाहीत ना, अशी भीती त्यांना वाटते अशी जळजळीत टीका मायावती यांनी केली. 

अलवर बलात्कारकांडावरून मोदींनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना मायवती यांनी नरेंद्र मोदींवर वैयक्तिक टीका करत हल्ला चढवला. ''राजकीय लाभासाठी आपल्या पत्नीला सोडणारे नरेंद्र मोदी हे  बहीण आणि पत्नीचा सन्मान करणे म्हणजे काय हे कसे जाणणार. भाजपा नेते जेव्हा मोदींना भेटायला जातात तेव्हा त्यांच्या पत्नी घाबरतात. कारण मोदी आपल्या पत्नीप्रमाणेच आम्हालाही आपल्या पतीपासून वेगळे करणार नाहीत ना अशी भीती त्यांना वाटते.'' अशी टीका मायावती यांनी केली.दरम्यान, मायावतींनी केलेल्या या वक्तव्याबाबत भाजपाने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मायावतींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी जे शब्द वापरले आहेत ते अत्यंत अशोभनीय आहेत. हा कसला विचार आहे. तुम्ही मोदींचा एवढा द्वेश का करता? मोदींनी आपल्या कुटुंबाऐवजी देशालाच परिवार मानल्याने म्हणून का? अशी विचारणा भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी ट्विटच्या माध्यमातून केली आहे. मोदींवर टीका करताना मायावती पुढे म्हणाल्या की, नरेंद्र मोदी हे अलवर येथील बलात्कारप्रकरणी एवढे दिवस गप्प होते. मात्र मी बोलल्यानंतर त्यांनी आपल्या पक्षाला राजकीय लाभ मिळावा म्हणून आपले घाणेरडे राजकारण सुरू केले आहे.  

टॅग्स :mayawatiमायावतीNarendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारणLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक