व्हॉट्सअॅप जुनाच 'स्टेटस' पुन्हा ठेवणार
By Admin | Updated: February 25, 2017 21:07 IST2017-02-25T20:05:07+5:302017-02-25T21:07:44+5:30
व्हॉट्सअॅपने नुकतंच लाँच केलेलं स्टेटस फिचर अनेक युजर्सना अजिबात आवडलेलं नसून अनेकांनी हा बदल केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे

व्हॉट्सअॅप जुनाच 'स्टेटस' पुन्हा ठेवणार
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 - व्हॉट्सअॅपने नुकतंच लाँच केलेलं स्टेटस फिचर अनेक युजर्सना अजिबात आवडलेलं नसून अनेकांनी हा बदल केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. अनेकांनी जुनंच स्टेटस फिचर जास्त चांगलं होतं असं मत व्यक्त केलं आहे. युजर्सकडून नकारात्मक प्रतिक्रिया येत असल्याने व्हॉट्सअॅप पुन्हा एकदा आपलं जुनं स्टेटस फिचर आणण्याचा विचार करत आहे, ज्यामध्ये फक्त शब्दांमधून व्यक्त करण्याची संधी मिळत होती.
व्हॉट्सअॅ्पनं गुरुवारी आपल्या 8व्या वाढदिवसानिमित्त ‘स्टेटस’ फीचर लाँच केलं होतं. यानुसार युजर्सना स्टेटसमध्ये फक्त टेक्स्ट न टाकता फोटो, व्हिडीओ आणि GIF अपलोड करण्याचा पर्याय दिला आहे. मात्र हा बदल खूपच त्रासदायक असून जुनं फिचर जास्त सोयीस्कर होतं असं अनेक युजर्सनी म्हटलं आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅ्पकडून जुनं फीचर हे नव्या नावानं रिलाँच केलं जाऊ शकतं. काही वृत्तानुसार, कंपनी आपलं जुनं फीचर Tagline नावानं पुन्हा आणू शकतं. व्हॉट्सअॅपसंबंधी माहिती लीक करणारं ट्विटर हॅण्डल WABetaInfo ही माहिती शेअर केली आहे.
मुळात नवं फिचर आलं आहे, यापेक्षा जुना टेक्स्टचा पर्याय गेल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सोबतच ठेवलेला फोटो किंवा स्टेटसचा सर्वांना अलर्ट जातो हेदेखील अनेकांना आवडलेलं नाही.
व्हॉट्सअॅ्पचं नवं फिचर व्हॉट्सअॅप स्टेसमध्ये टेक्स्टच्या ऐवजी एक छोटा व्हिडीओ टाकणं शक्य आहे. ही सोय किंवा फिचर इंस्टाग्रामवर (Instagram Stories) उपलब्ध असून स्नॅपचॅटशी मिळतं जुळतं आहे. हे व्हॉट्सअॅप स्टेटस 24 तासानंतर आपोआप गायब होते.