शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

व्हॉटस्अ‍ॅपने सप्टेंबरमध्ये दिली हेरगिरीची सूचना? लक्ष्य कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2019 06:09 IST

संडे अँकर। हेरगिरी प्रकरणात नवे खुलासे; आरटीआयअंतर्गत सरकारवर प्रश्नांचा भडिमार

पेगॅससने ज्या १४०० लोकांना लक्ष्य केले होते त्यात भारतातील पत्रकार, मानवाधिकार कार्यकर्ते यांचा समावेश होता. व्हॉटस्अ‍ॅपच्या सूत्रांनी सांगितले की, सरकारी एजन्सींनी मेपासून आम्हाला या प्रकरणात थेट विचारणा केली नव्हती. आमच्या मेसेजचे उत्तरही दिले नाही आणि त्यांनी अधिक माहितीही मागितली नव्हती.

नवी दिल्ली : भारतातील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांना हेरगिरीचे लक्ष्य बनविले गेल्याचे प्रकरण समोर आले असताना या प्रकरणात आता नव्याने काही खुलासे होत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हॉटस्अ‍ॅपने चार महिन्यांपूर्वी सरकारला सांगितले होते की, पेगॅसस स्पायवेअरने १२१ लोकांना लक्ष्य केले आहे.

एनएसओ ग्रुप टेक्नॉलॉजीज लि. आणि क्यू सायबर टेक्नॉलॉजी लि.विरुद्ध उत्तर कॅलिफोर्नियाच्या न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या खटल्यात व्हॉटस्अ‍ॅपने दावा केला आहे की, एप्रिल २०१९ आणि मे २०१९ च्या दरम्यान व्हॉटस्अ‍ॅप सर्व्हरचा उपयोग करण्यात आला. तथापि, व्हॉटस्अ‍ॅपचे एंड- टू-एंड एन्क्रिप्शन तोडण्यात एनएसओ असमर्थ ठरले, असाही दावा यात करण्यात आला आहे.आरटीआय कार्यकर्त्याचा संघर्षपुड्डुचेरीतील एक माहिती अधिकार कार्यकर्ते सौरव दास यांनी म्हटले आहे की, पेगॅससबाबतच्या माहितीसाठी आपण आता अपिलीय अधिकाऱ्यांकडे धाव घेणार आहोत. सौरव दास यांनी माहितीच्या अधिकारात २३ आॅक्टोबर रोजी माहिती मागविली होती. ३१ आॅक्टोबर रोजी त्यांना असे उत्तर मिळाले की, गृहमंत्रालयाला पेगॅससबाबत माहिती नाही. दास यांनी असा प्रश्न उपस्थित केला आहे की, सरकारने पेगॅससची खरेदी केली होती काय? अथवा स्पायवेअर खरेदीचा प्रस्ताव होता काय? अथवा भविष्यात असा प्रस्ताव आहे काय?

इस्रायल फर्मसोबत सरकारचा कोणताही करार नाहीभारत सरकारने इस्रायलची कंपनी एनएसओसोबत कोणताही करार केलेला नाही, असे सूत्रांनी सांगितले. तथापि, व्हॉटस्अ‍ॅपला नोटीस पाठविण्यात आली असून, उत्तर देण्यासाठी ४ नोव्हेंबरपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे.

या कंपनीकडून उत्तर आल्यानंतर सरकार कारवाईबाबत विचार करणार आहे. व्हॉटस्अ‍ॅपने याचा पुनरु च्चार केला आहे की, आमच्या युजर्सच्या गोपनीयतेला आणि सुरक्षेला आम्ही सर्वोच्च प्राधान्य देतो.

 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅप