महिला सुरक्षेसाठी व्हॉटस् अॅपची मदत, ७२ जणांवर कारवाई
By Admin | Updated: February 7, 2015 02:49 IST2015-02-07T02:49:54+5:302015-02-07T02:49:54+5:30
महिला सुरक्षा व सक्षमीकरणासाठी राजस्थान पोलिसांनी सुरू केलेल्या व्हॉटस् अॅप योजनेचे सुखद परिणाम समोर आले आहेत़

महिला सुरक्षेसाठी व्हॉटस् अॅपची मदत, ७२ जणांवर कारवाई
जयपूर : महिला सुरक्षा व सक्षमीकरणासाठी राजस्थान पोलिसांनी सुरू केलेल्या व्हॉटस् अॅप योजनेचे सुखद परिणाम समोर आले आहेत़ या माध्यमातून तक्रार नोंदविणाऱ्यांऱ्या महिलांची संख्या वाढली असून ७२ लोकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे़ पोलिसांनी महिला व तरुणींना व्हॉटस् अॅप मोबाईल क्रमांकावर गुंड, टवाळखोरांकडून होणारा त्रास, तसेच यासंदर्भातील तक्रारींचे व्हिडिओ, आॅडिओ क्लिपिंग, व्हाईस मॅसेजेस वा फोटो नियंत्रण कक्षाला पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती़ या सुविधेचे परिणाम उत्साह वाढविणारे असल्याचे पोलीस महासंचालक ओमेंद्र भारद्वाज यांनी सांगितले.