महिला सुरक्षेसाठी वॉट्स ॲपची मदत ७२ जणांविरुद्ध कारवाई

By Admin | Updated: February 6, 2015 22:35 IST2015-02-06T22:35:09+5:302015-02-06T22:35:09+5:30

जयपूर: महिला सुरक्षा आणि सक्षमीकरणासाठी राजस्थान पोलिसांनी गत जानेवारीत सुरू केलेल्या वाट्स ॲप योजनेचे सुखद परिणाम समोर आले आहेत़ वाट्स ॲपच्या माध्यमातून तक्रार नोंदविणाऱ्यांऱ्या महिलांची संख्या वाढली असून याअंतर्गत ७२ लोकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे़

Whatsapp help against women for safety of women | महिला सुरक्षेसाठी वॉट्स ॲपची मदत ७२ जणांविरुद्ध कारवाई

महिला सुरक्षेसाठी वॉट्स ॲपची मदत ७२ जणांविरुद्ध कारवाई

पूर: महिला सुरक्षा आणि सक्षमीकरणासाठी राजस्थान पोलिसांनी गत जानेवारीत सुरू केलेल्या वाट्स ॲप योजनेचे सुखद परिणाम समोर आले आहेत़ वाट्स ॲपच्या माध्यमातून तक्रार नोंदविणाऱ्यांऱ्या महिलांची संख्या वाढली असून याअंतर्गत ७२ लोकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे़
राजस्थान पोलिसांनी महिला व तरुणींना वाट्स ॲप मोबाईल क्रमांकावर गुंड, टवाळखोरांकडून होणारा त्रास तसेच यासंदर्भातील तक्रारींचे व्हिडिओ, ऑडिओ क्लिपिंग, व्हाईस मॅसेजेस वा फोटो नियंत्रण कक्षाला पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती़ या सुविधेचा लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या वाढली असून परिणाम उत्साह वाढविणारे असल्याचे पोलीस महासंचालक ओमेन्द्र भारद्वाज यांनी म्हटले आहे़

Web Title: Whatsapp help against women for safety of women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.