शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

संघाच्या कार्यक्रमात प्रणव मुखर्जी काय बोलणार? काँग्रेसला चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2018 10:20 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्ग समारोपाच्या कार्यक्रमाला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे मुख्य अतिथी म्हणून राहणार असल्याचे निश्चित झाल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

नवी दिल्ली -  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्ग समारोपाच्या कार्यक्रमाला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे मुख्य अतिथी म्हणून राहणार असल्याचे निश्चित झाल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मात्र या कार्यक्रमास उपस्थित राहण्याच्या मुखर्जी यांच्या निर्णयामुळे काँग्रेसची गोची झाली असून, 7 जून रोजी होणाऱ्या या कार्यक्रमात मुखर्जी नेमके काय बोलणार याची चिंती काँग्रेसला लागली आहे.  7 जून रोजी होणाऱ्या या कार्यक्रमासाठी सरसंघचालक मोहन भागवत यांनी प्रणव मुखर्जी यांना स्वत: निमंत्रित केले होते. हे निमंत्रण मुखर्जी यांनी स्वीकारल्याने आता प्रणव मुखर्जी आणि सरसंघचालक डॉ.मोहन भागवत हे एकाच मंचावर येणार आहेत. एकेकाळी कॉंग्रेसचे दिग्गज नेते राहिलेले मुखर्जी संघाच्या कार्यक्रमात येणार असल्याचे निश्चित झाल्यामुळे संपूर्ण देशाच्या राजकारणाचे लक्ष या कार्यक्रमाकडे असेल.  मात्र संघाच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याच्या प्रणव मुखर्जींच्या निर्णयावर टीकाही होत आहे. काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांनी प्रणव मुखर्जींच्या निर्णयावर टीका केली आहे. मात्र काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने या घटनाक्रमाबाबत कोणतीही प्रतिक्रिया देणे टाळले असून, त्यांच्याकडून संघाच्या कार्यक्रमाची वाट पाहिली जात आहे. याबाबत विचारणा केली असता काँग्रेसचे प्रवक्ते टॉम वडक्कन यांनीही याबाबत अधिक बोलणे टाळले. मात्र काँग्रेस आणि संघाच्या विचारसरणीमध्ये मोठी तफावत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेसचे अन्य एक वरिष्ठ नेते अभिषेक मनू सिंघवी म्हणाले, "मुखर्जी यांनी राष्ट्रपती बनल्यानंतर राजकारण सोडले आहे. आता कोणत्याही समारंभात त्यांचे बोलणे हे त्यांच्या भूमिकेबाबतचा संकेत असू शकत नाही. प्रणव मुखर्जी यांनी आपल्या 50 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीदरम्यान जे राजकीय मानदंड स्थापित केले त्यावरून त्यांच्या योगदानाचे मूल्यांकन केले गेले पाहिजे." दरम्यान,  प्रणव मुखर्जींचे निकटवर्तीय असलेल्यांचे म्हणणे आहे की, माजी राष्ट्रपती या कार्यक्रमात संघाच्या स्वयंसेवकांना राष्ट्रवादाच्या खऱ्या व्याख्येची ओळख करून देऊ शकतात. अशा परिस्थितीत मुखर्जी यांचे भाषण हिंदुत्ववाद्यांच्या राष्ट्रवादाच्या एकांगी व्याख्येवर टीका करणारेही असू शकते. मात्र असे असले तरी प्रणव मुखर्जी यांची संघाच्या कार्यक्रमातील उपस्थिती काँग्रेस आणि सेक्युलर विचारांसाठी धक्का असल्याचे काँग्रेसच्या एका नेत्याने म्हटले आहे.   

टॅग्स :Pranab Mukherjeeप्रणव मुखर्जीcongressकाँग्रेसRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवतPoliticsराजकारण