शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेने इराणबरोबरचा करार मागे घेतल्यामुळे भारतावर काय परिणाम होईल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2018 17:48 IST

तेल आयातीत सध्या अडथळा येणार नसला तरी तेलाचे दर मात्र वाढण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे.

नवी दिल्ली- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी बराक ओबामा यांच्या प्रशासनाने इराणशी केलेल्या कराराला रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच इराणवर नवी बंधनेही लादण्यात आली आहेत. ट्रम्प यांच्या या निर्णायाचा भारतासह इतर अनेक देशांवर परिणाम होणार आहे.  भारत आणि इराण यांचे संबंध सध्या वेगाने सुधारत आहेत. पायाभूत सुविधांसह दोन्ही देशांमध्ये विविध विषयांवर करार झाले आहेत. इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी फेब्रुवारी महिन्यामध्ये भारताला भेट दिली होती. त्यामुळे अमेरिकेने जरी इराणवर बंधने लादली असली आणि इतर देशांना इराणपासून लांब राहाण्याचे संकेत दिले असले तरी भारत व इराण यांच्या संबंधांमध्ये फारसा तणाव येणार नाही.भारताने चाबहार बंदराच्या विकासासाठी 50 कोटी डॉलर्सची गुंतवणूक करण्याचे निश्चित केले आहे. चाबहार हे मध्यपुर्वेत अत्य़ंत महत्त्वाच्या ठिकाणी आहे. तसेच भारताला व्यापारामध्ये या बंदरामुळे मोठा फायदा होणार आहे. चाबहारमधील गुंतवणूक अमेरिकेचे लक्ष वेधून घेऊ शकते. चाबहारप्रमाणे दुसरा सर्वात काळजीचा मुद्दा आहे तो तेलाचा. भारत हा तेलाचा वापर करणारा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे. तर सौदी अरेबिया आणि इराक यांच्यानंतर भारताला कच्चे तेल पुरवणाऱ्या देशांमध्ये इराण आघाडीवर आहे. भारत इराणकडून कच्चे तेल खरेदी करण्यासाठी युरोपियन बँकामार्फत युरोचा वापर करत आहे जोपर्यंत ते थांबवले जात नाही तोपर्यंत इराणकडून मिळणाऱ्या तेल आयातीत अडथळा येणार नाही.तेल आयातीत सध्या अडथळा येणार नसला तरी तेलाचे दर मात्र वाढण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. अमेरिकेने करार रद्द करण्यापुर्वीच जागतिक बँकेने तेलाच्या दरात 20 टक्क्यांनी वाढ होईल असे भाकित वर्तवले होते. तसेच व्हेनेझुएलाच्या तेल उत्पादनात घट झाल्यामुळे आणि तेथिल राजकीय, आर्थिक अस्थिरतेमुळे तेल महागले होते. आता तेलाचे दर आणखी वाढल्यास भारताच्या जीडीपी आणि रुपयावर परिणाम होईल आणि चलनवाढीचा दरही वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :ChabaharचाबहारCrude Oilखनिज तेल