Amit Shah At Book Launch : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू-काश्मीरबाबत एक मोठे विधान केले आहे. आज, (02 जानेवारी, 2025) दिल्ली येथे 'जम्मू-काश्मीर आणि लडाख: हिस्टोरिकल अकाउंट ऑफ कंटिन्युटी अँड कनेक्टिव्हिटी' या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात बोलताना त्यांनी कलम 370 आणि दहशतवादावर प्रतिक्रिया दिली. तसेच, अप्रत्यक्षपणे पाकव्याप्त काश्मीरही लवकरच भारताचा भाग होईल, असे विधान केले.
अमित शाह म्हणतात, ब्रिटिशांच्या काळात लिहिलेल्या इतिहासाची व्याख्याच चुकीचा होती. संपूर्ण जगाशी भारताचे संस्कृतीचे नाते आहे. या देशाकडे फक्त भूराजकीय दृष्टिकोनातून पाहणाऱ्यांना देशाने, भारताची व्याख्या करू नये. काश्मीरमध्ये जी कला, वाणिज्य आणि संस्कृती होती, ती हळूहळू संपूर्ण भारतात पसरली गेली, ती आजही भारताचा अविभाज्य भाग होती आणि कायम राहील.
370 ने दहशतवादाची बीजे पेरलीमोदी सरकारने कलम 370 रद्द करण्याचे काम केले. या 370 ने काश्मीरमध्ये दहशतवाद आणि फुटीरतावादाची बीजे पेरली. 370 हटवल्यानंतर दहशतवादी घटना कमी झाल्या. खोऱ्यातील दहशतवादाची परिसंस्था उद्ध्वस्त झाली. अनेकदा लोक मला विचारतात की, कलम 370 आणि दहशतवादाचा काय संबंध आहे? त्यांना कदाचित माहित नसेल की, कलम 370 नेच खोऱ्यातील तरुणांच्या मनात फुटीरतावादाची बीजे पेरण्याचा प्रयत्न केला. देशाच्या इतर भागात दहशतवाद का आला नाही? गुजरात आणि पंजाब पाकिस्तानला लागून आहेत.
कलम 370 ने भारत आणि काश्मीरमधील संबंध तात्पुरते असल्याचा गैरसमज पसरवण्याचे काम केले. यामुळे अलिप्ततावादाची बीजे पेरली गेली आणि पुढे त्याचे रूपांतर दहशतवादात झाले. 40 हजारांहून अधिक लोक बळी पडले. कलम 370 हटवल्यानंतर दहशतवादात 70 टक्क्यांहून अधिक घट झाली. 370 हा दहशतवादाचा स्रोत होता हे सिद्ध करते, असेही शाह यावेळी म्हणाले.
आम्ही जे गमावले, ते लवकरच परत मिळवूपीओकेचे नाव न घेता गृहमंत्री म्हणाले, आजकाल काश्मीरमध्ये विकास होताना दिसत आहे आणि मला याचा आनंद आहे. मला विश्वास आहे की आपण जे काही गमावले आहे, ते लवकरात लवकर परत मिळेल. केवळ भौतिक विकासच नाही, तर काश्मीरची सांस्कृतिक उंचीही लवकरच गाठली जाईल. काश्मीरचे नाव कश्यप होऊ शकते. शंकराचार्यांचा उल्लेख, रेशीम मार्ग, हेमिष मठ यावरून काश्मीरमध्येच भारताच्या संस्कृतीचा पाया घातला गेला होता, हे सिद्ध होते. सूफी, बौद्ध आणि शैल मठांनी काश्मीरमध्ये विकास केला. 8,000 वर्षे जुन्या प्राचीन ग्रंथांत जम्मू-काश्मीर आणि लडाखचा उल्लेख आहे, असेही शाह यावेळी म्हणाले.