शहरं
Join us  
Trending Stories
1
चारशे पार सोडा, मोदी आणि एनडीएला २५० जागाही मिळणार नाहीत, या एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज 
2
खळबळजनक! नांदेडमध्ये मशीन गनचे ३९१ राऊंड कालव्यात सापडले
3
Exit Poll : कंगना राणौत की विक्रमादित्य सिंह... कोण मारणार बाजी?; जाणून घ्या, मंडीचा एक्झिट पोल
4
दोन राज्यांत मतमोजणी, अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाची मुसंडी, तर सिक्कीममध्ये SKM निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने 
5
T20 WC, USA vs CAN: यजमानांचा दबदबा! १० सिक्स आणि ४ फोर; एकट्या 'जोन्स'ने कॅनडाला घाम फोडला
6
"मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन, ४ जूनला एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील"
7
आयकर विभागाचा मोठा छापा; हवाला व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांकडून २५ कोटींची रोकड, हिरे, सोनं जप्त
8
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज
9
सातवा टप्पाही पूर्ण; निकालाची प्रतीक्षा; ८,३६० उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद
10
'मी केदारनाथला गेल्यावर..'; सुशांतच्या बहिणीची भावूक पोस्ट, फोटो शेअर करत सांगितलं खास कनेक्शन
11
किती खरे आणि किती खोटे ठरले यापूर्वीचे ‘एक्झिट पाेल’?, मतदानानंतर सर्वांचे असते याकडे लक्ष
12
T20 WC 2024: ऑस्ट्रेलिया नाही! पण भारत फायनल खेळणार; 'युवी'ने सांगितला खेळ भावनांचा
13
धक्कादायक! ११ प्रवाशांनी भरलेली बोट नदीत उलटली; ७ जणांचा बुडून मृत्यू, ४ जण बचावले
14
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
15
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
17
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
18
आजही अडचणींचा डोंगर, वेळेत काम पूर्ण करण्याचे नियोजन
19
एमएचटी-सीईटीच्या चुकीच्या उत्तरांची दखलच नाही, एक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील फॉर्म्युल्यावर आधारित 
20
भारतीय फलंदाजांनी निडरपणे खेळावे - सौरव गांगुली

Budget 2019: काय आहे युनिव्हर्सल बेसिक इन्कम?, ज्याची राहुल गांधींनी केलीय घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 8:19 AM

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी छत्तीसगडमधून लोकसभा निवडणूक 2019च्या प्रचाराचं रणशिंग फुंकलं आहे.

ठळक मुद्देकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी छत्तीसगडमधून लोकसभा निवडणूक 2019च्या प्रचाराचं रणशिंग फुंकलं आहे. निव्हर्सल बेसिक इन्कम योजना म्हणजे नक्की काय आहे, प्रश्न सर्वांनाच सतावतो आहे. आर्थिक सर्वेक्षणातही यूबीआय हा एक शक्तिशाली विचार असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं होतं.

रायपूर- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी छत्तीसगडमधून लोकसभा निवडणूक 2019च्या प्रचाराचं रणशिंग फुंकलं आहे. रायपूरच्या अटलनगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सभेत त्यांनी गरिबांसाठी युनिव्हर्सल बेसिक इन्कम लागू करण्याची घोषणा केली आहे. परंतु ही युनिव्हर्सल बेसिक इन्कम योजना म्हणजे नक्की काय आहे, प्रश्न सर्वांनाच सतावतो आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ही योजना लागू करण्याची घोषणा केली आहे. सरकारच्या शेवटच्या बजेटमध्ये या योजनेची घोषणा करण्याची शक्यता आहे.संसदेतही 2017-18 या आर्थिक वर्षांत झालेल्या सर्वेक्षणाचा विषय चर्चेला आला होता. आर्थिक सर्वेक्षणातही यूबीआय हा एक शक्तिशाली विचार असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं होतं. तात्काळ यूबीआय लागू करणं शक्य नसलं तरी कालांतरानं तो लागू करण्याचा विचार होऊ शकतो. विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या 950 योजना सुरू असून, सर्वाधिक पैसा त्या योजनांवरच खर्च होत आहे. तसेच मध्यम वर्गाच्या खाद्य, घरगुती गॅससारख्या सबसिडी योजनांवर तीन टक्के पैसा खर्च होतो. या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यास यूबीआय हे सहाय्यक ठरू शकणार आहे. यूबीआय योजनेंतर्गत मिळणाऱ्या रकमेचं हस्तांतरण थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात होणार आहे. त्यामुळे मधल्या मध्ये या योजनांतून पैसा खाणाऱ्यांना चाप बसणार असून, त्याचा थेट फायदा गरिबाला होणार आहे.भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार राहिलेल्या अरविंद सुब्रमण्यम यांनी 29 जानेवारी 2018मध्ये सांगितलं होतं की, पुढच्या वर्षी एक ते दोन राज्यांत युनिव्हर्सल बेसिक इन्कमची सुरुवात होऊ शकते. मध्य प्रदेशमध्ये 2010 ते 2016मध्ये राबवण्यात आलेल्या पायलट प्रोजेक्टलाही सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. इंदुरमध्येही 8 गावांमध्ये 6 हजारांची लोकसंख्या असताना पुरुष आणि महिलांना 500 आणि लहानग्यांना 150 रुपये प्रतिमहिना देण्यात आले. तेलंगणा आणि झारखंडसारख्या छोट्या राज्यांत सध्या ही योजना सुरू आहे. तर सायप्रस, फ्रान्स, अमेरिका, ब्राझिल, कॅनडा, डेन्मॉर्क, फिनलँड, जर्मनी, नेदरलँड आणि आयर्लंड, लग्जमबर्ग यांना देशांमध्ये यूबीआय ही योजना आधीपासूनच कार्यान्वित आहे. खात्यामध्ये कसे येणार पैसे?युनिव्हर्सल बेसिक इन्कम योजना लागू करण्यासाठी आधारच्या नंबरचा वापर केला जाणार आहे. योजनेत सहभागी असलेल्या नागरिकांच्या बँक खात्याला आधार कार्डशी जोडण्यात येणार आहे. त्यानंतर सरकारकडून मिळणारे पैसे थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. सध्या घरगुती गॅस सिलिंडरवर सबसिडी दिली जाते. पण ही योजना लागू झाल्यानंतर ती सबसिडी बंद होऊ शकते. लंडनच्या प्रोफेसरची होती आयडियायूबीआयचा सल्ला लंडन युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर गाय स्टँडिंग यांनी दिला होता. त्यांच्या नेतृत्वाखालीच मध्य प्रदेश आणि इंदुरमधल्या 8 गावांमध्ये पायलट प्रोजेक्ट राबवण्यात आला. ट्रायलच्या स्वरूपात 6 हजारांची लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये 2010 ते 2016मध्ये हा प्रोजेक्ट चालवला होता. त्यानंतर 500 रुपये गावातल्या प्रत्येक व्यक्तीच्या बँक खात्यात टाकण्यात आले. तर लहानग्याच्या खात्यात 150 रुपये जमा केले. याचा गोरगरीब जनतेला मोठा फायदा झाला.  

टॅग्स :Budget 2019अर्थसंकल्प 2019government schemeसरकारी योजनाRahul Gandhiराहुल गांधी