शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

No Confidence Motion : ना संख्या, ना बहुमत... पण 'मोदी हटाओ'साठी झटापट; पंतप्रधानांची विरोधकांना चपराक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 9:51 PM

काही लोकांमध्ये किती नकारात्मकता आहे, काही लोकांना नकारात्मक राजकारणाने कसं घेरलंय हे आज समजलं, त्यांचा चेहरा आज सर्वांच्या समोर आला अशा शब्दांमध्ये काँग्रेस खासदारांचं नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीका केली.

नवी दिल्ली : काही लोकांमध्ये किती नकारात्मकता आहे, काही लोकांना नकारात्मक राजकारणाने कसं घेरलंय हे आज समजलं, त्यांचा चेहरा आज सर्वांच्या समोर आला अशा शब्दांमध्ये काँग्रेस खासदारांचं नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीका केली. चर्चेची तयारी नव्हती तर अविश्वास दर्शक ठराव मांडलाच कशाला, ही चर्चा टाळण्याचा प्रयत्न विरोधक का करत होते? राहुल गांधी यांनी पंतप्रधानांच्या जागेवर जाऊन मिठी मारण्याच्या घटनेचाही त्यांनी चांगलाच समाचार घेतला.  ही आपल्या सरकारची परिक्षा नाही तर काँग्रेसच्या तथाकथित मित्रपक्षांची आहे. 2019 साली सरकार आल्यावर केवळ मी पंतप्रधान होणार असे काँग्रेसच्या नेत्यांना वाटत आहे. हे नेते आपल्या साथीदार पक्षांच्या भावना जाणून घेण्यासाठी आजच्या अविश्वास ठरावाची मदत घेत आहेत.

आज दुपारी केवळ चर्चा सुरु होती, तेव्हा कोणताही निर्णय झाला नव्हता त्याआधीच पंतप्रधानांच्या जागेवर येऊन उठा उठा असे म्हणण्याची घाई काही लोकांना लागली आहे. या जागेवर कोणीही बसवत नाही किंवा कोणी उठवूही शकत नाही. फक्त सव्वाशे कोटी लोकच तुम्हाला या जागेवर बसवू शकतात. पंतप्रधानपदाची घाई कसली झाली आहे अशा शब्दांमध्ये राहुल गांधी यांना मोदी यांनी प्रश्न विचारुन काँग्रेसला निरुत्तर केले. केवळ मीच पंतप्रधान बनणार या भावनेला बळकट करण्यासाठी काँग्रेसचे नेते प्रयत्न करत आहेत असे सांगत आपल्या एकेक योजनेची माहिती व त्यामुळे देशाला झालेला फायदा याची यादी त्यांनी वाचून दाखवली. मेक इन इंडिया, आर्थिक व्यवहारांचे डिजिटायजेशन, काळ्या पैशाविरोधात सरकारचे प्रयत्न, 

अविश्वासदर्शक ठरावाच्या विरोधकांच्या हेतूबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले, केवळ नरेंद्र मोदी यांना बाजूला करण्याच्या एकमेव भावनेने विरोधक एकत्र येत आहेत. आम्ही या पदावर आहोत कारण सव्वाशे कोटी लोकांचे आम्हाला आशीर्वाद मिळालेले आहेत. सबका साथ सबका विकास या घोषणेबरोबर आमचं सरकार काम करत आलं आहे. याबरोबर पंतप्रधान मोदी यांनी आपल्या सरकारची विविध कामांची जंत्रीच वाचून दाखवली. आपले सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी कटिबद्ध आहे असेही त्यांनी पुन्हा एकदा सांगितले. प्रधानमंत्री फसलविमा योजनेतून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न आमच्या सरकारने केला आहे.

भाषणाच्या सुरुवातीस पंतप्रधान मोदी यांनी , ''ज्या पद्धतीने आपण सभागृहाचं संचलन केलं याबद्दल मी आपला आभारी आहे'' अशा शब्दात सभापती सुमित्रा महाजन यांचे आभार मानले. तसेच अविश्वास ठरावाचा विरोध करण्याचं सर्व सभागृहाला आवाहन केले. पंतप्रधानांच्या भाषणात टीडीपी खासदारांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला तसेच घोषणाबाजीही सुरु केली. या घोषणांमध्येच पंतप्रधानांनी भाषण सुरु ठेवले.

टॅग्स :No Confidence motionअविश्वास ठरावNarendra Modiनरेंद्र मोदीParliamentसंसद