कुुत्र्याला दगड मारला तर सरकारचा काय संबंध - दलित हत्याकांडावरून व्ही. के. सिंग यांचा सवाल
By Admin | Updated: October 22, 2015 13:19 IST2015-10-22T12:40:33+5:302015-10-22T13:19:31+5:30
एखाद्या व्यक्तीने कुत्र्याला दगड मारला तर त्याचा सरकारशी काय संबंध असे वादग्रस्त विधान करत व्ही. के. सिंग यांनी दलित हत्याकांडाचा सरकारशी संबंध जोडू नका असे म्हटले आहे.

कुुत्र्याला दगड मारला तर सरकारचा काय संबंध - दलित हत्याकांडावरून व्ही. के. सिंग यांचा सवाल
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २२ - स्थानिक मुद्यांचा केंद्र सरकारशी संबंध जोडू नका, ते तेथील प्रशासनाचे अपयश असे सांगत हरियाणातील दलित हत्याकांडासाठी केंद्र सरकारला जबाबदार धरता येणार नाही, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंग यांनी केले आहे. समजा उद्या जर एखाद्याने कुत्र्याला दगड मारला तर त्याला सरकार कसे जबाबदार असेल असा खळबळजनक प्रश्न विचारत त्यांनी नवा वाद ओढवून घेतला आहे. दलित हत्याकांडांसारख्या संवदेनशील घटनेला व्ही. के. सिंग यांनी शुल्लक ठरवत सरकारची जबाबदारी झटकल्याने विरोधाकांनी तीव्र शब्दांत नाराजी नोंदवली आहे.
मंगळवारी पहाटे हरियणातील फरिदाबाद येथे एका दलित कुटुंबावर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळण्यात आले होते, त्यात दोन बालकांचा होरपळून मृत्यू झाला होता. या घटनेचे राजकीय पडसाद उमटले असून विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आरोपीच्या पिंज-यात उभे केले.
मात्र या घटनेचा केंद्र सरकारशी काहीही संबंध नसल्याचे सांगत ही घटना तेथील स्थानिक प्रशासनाच्या अपयशामुळे घडल्याचे सिंग यांनी म्हटले आहे.