शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

संमेलन शुं छे? संमेलननगरीतच विद्यार्थी अनभिज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 3:46 AM

९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाविषयी साहित्य वर्तुळात उत्साहाचे वातावरण आहे. त्यातच ८३ वर्षांनंतर बडोद्याला पुन्हा साहित्य संमेलनाचे यजमानपद मिळाले आहे.

बडोदा साहित्यनगरी : ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाविषयी साहित्य वर्तुळात उत्साहाचे वातावरण आहे. त्यातच ८३ वर्षांनंतर बडोद्याला पुन्हा साहित्य संमेलनाचे यजमानपद मिळाले आहे. मात्र, बडोदा येथील साहित्यनगरी अशी ओळख असणाºया महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठातील विद्यार्थीच या मराठी साहित्य संमेलनापासून अनभिज्ञ असल्याचे दिसून येते आहे. शिवाय, बडोदेकरही या साहित्य संमेलनाच्या सोहळ्याबाबत उदासीन असल्याचे चित्र आहे.बडोद्यामध्ये महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या कारकीर्दीत १९०९, १९२१ आणि १९३४ अशी तीन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर २०१८मध्ये पुन्हा एकदा या साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा मान बडोदेकरांना मिळाला आहे. मात्र, खुद्द संमेलननगरी असा थाट मिरवणाºया महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठातील विद्यार्थ्यांना इतका भव्य सोहळा या नगरीत होत आहे, याची तसूभरही कल्पना नाही. याउलट, विद्यापीठातील स्थानिक महोत्सवामध्ये हे विद्यार्थी दंग झालेले दिसून आले. मुख्य म्हणजे, बडोदा स्थानक येथे उतरल्यापासून संमेलननगरी या मार्गात संमेलनाविषयीचे एकही होर्डिंग लावण्यात आलेले नाही.संमेलन सोहळ्याविषयी विद्यापीठातील विद्यार्थी दिव्यांग शाह याला विचारले असता तो म्हणाला की, ‘संमेलन शुं छे? इस बारे कुछ पता नही, पर हमारा डान्स का प्रोग्राम है; वो बढिया शुरू है। मराठी संमेलन के बारे मे हमे प्राध्यापकोने भी नही बताया।’ विद्यार्थी मौनी जुमेदार हिला विचारले असता, ‘संमेलन असा शब्द फक्त कानावर पडला. मात्र, हे संमेलन कसले, कशासाठी, कोणी आयोजित केले, याबाबत काहीच माहिती नाही.’आयोजक अपयशीसाहित्य संमेलननगरीत म्हणजेच विद्यापीठाच्या आवारात काही कार्यक्रम आयोजित होणाºया ठरावीक जागा सोडल्या, तर कुठेही संमेलनाचा उत्साह दिसून येत नाही. शिवाय, विद्यापीठ असो वा आयोजक, दोघेही साहित्य संमेलन तरुणाईपर्यंत पोहोचविण्यात अपयशी ठरल्याचे दिसून येते.

टॅग्स :Baroda Sahitya Samelanबडोदा साहित्य संमेलन