शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

भारताने जिथे 'शक्ती' दाखवती ते लो अर्थ ऑर्बिट म्हणजे काय? जाणून घ्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 13:47 IST

भारताने ज्या लो अर्थ ऑर्बिटमध्ये आज ही संपूर्ण मोहीम राबवली ते लो अर्थ ऑर्बिट म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला माहित आहे का?

नवी दिल्ली -  भारताने आज लो अर्थ ऑर्बिटमध्ये उपग्रह विरोधी क्षेपणास्त्राचा वापर करून एक उपग्रह उद्ध्वस्त केल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित दिली.  भारतीय शास्त्रज्ञांच्या या कामगिरींमुळे भारत हा अंतराळात मारा करून उपग्रह उद्ध्वस्त करण्याची क्षमता बाळगणारा जगातील चौथा देश बनला आहे. दरम्यान भारताने ज्या लो अर्थ ऑर्बिटमध्ये आज ही संपूर्ण मोहीम राबवली ते लो अर्थ ऑर्बिट म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या.लो अर्थ ऑर्बिट म्हणजे पृथ्वीची सर्वात जवळ असलेली कक्षा होय. लो अर्थ ऑर्बिट भूपृष्ठापासून 160 किलोमीटर ते 2 हजार किलोमीटरपर्यंत स्थित असते. त्यानंतर मिडीयन अर्थ ऑर्बिट, Geosynchronous ऑर्बिट आणि हाय अर्थ ऑर्बिट अशा विविध कक्षा असतात. त्यापैकी हाय अर्थ ऑर्बिट हे पृथ्वीच्या पृष्टभागापासून 35 हजार 786 किमी अंतरावर स्थित आहे. सध्या भारताकडून अंतराळात मानव पाठवण्यासाठी  मोहीम आखली जात आहे. 2022 मध्ये तीन अंतराळवीरांना अंतराळात पाठवण्याचे भारताने निश्चित केले असून, हे अंतराळवीर लो अर्थ ऑर्बिटमध्येच राहणार आहेत. या मोहिमेबाबत इस्रोने सांगितले की, केवळ 16 मिनिटांमध्ये तीन भारतीय अंतराळवीरांना श्रीहरीकोटा येथून अंतराळात पोहोचववले जाईल. हे भारतीय अंतराळवीर अंतराळात लो अर्थ ऑर्बिटमध्ये 6 ते 7 दिवस राहणार आहेत. हल्लीच काही  उपग्रह लो अर्थ ऑर्बिटमध्ये पाठवले गेले होते.  जमिनीपासून अंतर कमी असल्याने येथून संदेशवहन चांगल्या पद्धतीने होत असते. तसेच काही उपग्रहांच्या माध्यमातून इंटरनेटच्या वेगात वाढ करण्यासाठीही प्रयत्न होत आहेत. मात्र कुठलाही उपग्रह लो अर्थ ऑर्बिटमध्ये टिकून राहणे खूप कठीण असते. 

टॅग्स :IndiaभारतEarthपृथ्वीisroइस्रोDRDOडीआरडीओ