शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

भाजपला काँग्रेसची इतकी भीती वाटण्याचे कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2024 06:32 IST

काँग्रेस सत्तेत नाही, पक्षाकडे पैसा नाही; तरीही भाजपने काँग्रेसमधल्या बेकार आणि कलंकित नेत्यांना आपल्या तंबूत घेण्यासाठी धडपड चालवली आहे. ही बेचैनी कसली?

अभिलाष खांडेकर, रोविंग एडिटर, लोकमत समूह

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आपल्या इतिहासात आज आहे इतकी कमजोर, दिशाहीन, निर्धन, नेतृत्वहीन कधीही नव्हती. दिल्लीत काँग्रेस दहा वर्षांपासून सत्तेच्या बाहेर आहे. तर मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, हरयाणा किंवा उत्तर प्रदेशसारख्या राज्यांत काँग्रेस अस्तित्वासाठी झगडते आहे. १९४७ पासून सातत्याने देशावर राज्य करणारा हा पक्ष आता अनेक राज्यांत दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावरचा पक्ष झाला आहे. भ्रष्टाचार, अंतर्गत कलह, नेहरू-गांधी परिवारावर टोकाचे अवलंबित्व, नव्या गोष्टींना नकार ही पक्षाच्या पतनाची प्रमुख कारणे. भविष्य चिंताजनक आहे. कारण या पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांची  खरीद-फ़रोख़्त  कधी नव्हती एवढी वाढली आहे. त्याचे श्रेय आक्रमक भाजपच्या रणनीतीचे! 

दहा वर्षांपूर्वी दिल्लीची सत्ता मिळाल्यानंतर लगेच सत्तारूढ पक्षाने भारत काँग्रेसमुक्त करण्याचा संकल्प सोडला. काँग्रेसने ही गोष्ट हसण्यावारी नेली; परंतु भाजप गांभीर्याने काम करत राहिला. २०१८ मध्ये छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये विजय मिळाल्यामुळे काँग्रेसला थोडा दिलासा मिळाला हे खरे; पण २०२३ मध्ये तिथेही पक्षाला पराभव पाहावा लागला. कर्नाटकात आणि अगदी अलीकडे तेलंगणात पक्षाला यश मिळाले. संसदेत या पक्षाचे खासदार इतके कमी झाले  की कट्टर समर्थकांनाही घोर निराशा यावी.

- असे असूनही भाजप मात्र सतत काँग्रेसबद्दल काळजी करताना दिसतो. मधल्या काळात काँग्रेसला पक्ष संघटना मजबूत करता आली नाही. त्यामुळे पक्ष आणखीन खोल संकटात गेला. दुसरीकडे भाजप सतत प्रयोग करत राहून नवीन नेते तयार तयार करत गेला. काँग्रेसला भाजपची नक्कलही करता आली नाही. ८२ वर्षांच्या मल्लिकार्जुन खरगे यांना अध्यक्ष करणे किंवा इच्छा नसताना दिग्विजय सिंह यांना ७७ व्या वर्षी लोकसभेच्या निवडणुकीत उतरवणे हे पक्षाच्या कमजोरीचे दाखलेच! अंतर्गत कलह आणि शिस्तीचा अभाव हे शाप काँग्रेसच्या नशिबी आहेतच. असे असूनही  राजकीय निरीक्षकांना या गोष्टीचे आश्चर्य वाटते आहे की, आपला प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसबद्दल भाजपला चिंता किंवा भीती वाटते आहे. 

भाजपला तिसऱ्यांदा सत्तेवर यायचे आहे. ‘इंडिया आघाडी’ मैदानात असूनही भाजपचे काम तसे सोपे आहे, असे बहुतेक निवडणूक विश्लेषकांना वाटते. आश्वासन दिल्याप्रमाणे राम मंदिराची निर्मिती झाली, कलम ३७० हटवले गेले, यातून हिंदू मतांची एकजूट झाली. चार महिन्यांपूर्वीच भाजपने मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये मोदींच्या गॅरंटीची मधुर फळे चाखली आहेत. पायाभूत सुविधांचा विकास होताना दिसतो आहे. ‘जी २०’च्या यशानंतर परराष्ट्र नीती वैश्विक शक्तीना मंत्रमुग्ध करीत आहे. चलनवाढीचा मुद्दा मध्यमवर्ग मांडताना दिसत नाही. योगी आणि यादव, विष्णू साई आणि शिंदे आपापल्या राज्यात चांगले काम करत आहेत. नितीश यांना मोहित करून ‘एनडीए’त पुन्हा आणले गेले आहे. मोठी व्यापारी घराणी भाजपच्या बरोबर आहेत. तर मग प्रश्न कुठे राहतो?

गेल्या पाच वर्षांतील प्रभावशाली सुशासनामुळे मोदींचे पारडे जड आहे; तरीही भाजप नेते जाता-येता काँग्रेसला कोसत आहेत. हल्ले करत आहेत. काँग्रेसला मुस्लिम समर्थक म्हणत हा पक्ष भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देतो असे सातत्याने देशाला सांगितले जाते आहे. काँग्रेस सत्तेत नाही आणि पैसा कमावण्यासाठीही सक्षम नाही हे भाजपला उत्तम प्रकारे माहीत होते. तरीही भाजपने काँग्रेसला तोडून त्या पक्षातल्या बेकार आणि कलंकित नेत्यांना आपल्या तंबूत येण्यासाठी राज्या-राज्यात आपल्या लोकांना कामाला लावले. ही बेचैनी कसली, कशामुळे आहे? जगातील सर्वांत मोठ्या पक्षाच्या टोलेजंग नेत्यांनी मरणपंथाला लागलेल्या एका पक्षावर आपली ताकद खर्च करण्यापेक्षा विकसित भारताविषयी बोलले पाहिजे, नाही का?

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेस